शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

​HEALTH : कमी रक्तदाबाने त्रस्त आहात? करा घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 6:55 AM

कमी रक्तदाबाच्या समस्येवर डॉक्टरांच्या सल्लयाबरोबरच औषधं घेण्यासोबतच काही घरगुती उपायही करता येतात.

नसांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब कमी होतो तेव्हा आपणास कमी रक्तदाबाची समस्या सतावते. उच्च रक्तदाबाप्रमाणेच कमी रक्तदाब हा सुद्धा गंभीर विकार आहे. यात जर आपला रक्तदाब ९०/६० किंवा यापेक्षा कमी असेल तर समजावे की आपणास कमी रक्तदाब आहे. ही समस्या असणाऱ्याच्या मेंदूला आणि शरीरातील इतर अवयवांना रक्ताचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्याने भोवळ येणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवतात. कशामुळे होतो कमी रक्तदाबभरपूर घाम आल्याने किंवा जुलाब झाल्याने शरीरातील पाणी कमी होणे, उच्च रक्तदाब किंवा इतर आजारांवर घेतली जाणारी औषधं, गंभीर स्वरूपाचा जंतूसंसर्ग, हृदयविकाराचा झटका, हृदय बंद पडणं, गरोदरपणा, मुर्च्छा ही कमी रक्तदाबामागील महत्त्वाची कारणं आहेत.  काय कराल घरगुती उपाय ?कमी रक्तदाबाच्या समस्येवर डॉक्टरांच्या सल्लयाबरोबरच औषधं घेण्यासोबतच काही घरगुती उपायही करता येतात.  * तुळशीच्या 10 ते 15 पानांचे तुकडे करून एका कपड्यात बांधून ठेवा. सकाळी उठल्यावर ही पानं एक चमचा मधात घालून हे मिश्रण खा. यानी नक्कीच मदत मिळेल.* 30 ते 32 बेदाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर हे बेदाणे चावून चावून खा. बेदाणे भिजवलेले पाणीही प्या.  * 7 ते 8 बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी बदाम सोलून वाटून घ्या. वाटलेले बदाम एक ग्लास दुधात घालून दूध गरम करा. गरम दूध घ्या.