अळूच्या पानांच्या वड्या आणि भाजी अनेक लोकं आवडीनं खातात. अळूची पानं फक्त चवीलाच चांगली नसून ती आरोग्य चांगलं राखण्यासाठीही फायदेशीर ठरतात. अळूच्या पानांना औषधी मानलं जातं. आयुर्वेदातही त्यांचे अनेक फायदे सांगण्यात आलेले आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अॅन्टी-ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. बाजारात सहज उपलब्ध होणारी ही भाजी फारशी लोकप्रिय नाही. परंतु या भाजीचे फायदे जाणून घेणं गरजेचं आहे.
डोळ्यांची दृष्टी
अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळून येतं. हे व्हिटॅमिन डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगल राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होतात.
सांधेदुखी
तुम्हाला सांधेदुखीचा जास्त त्रास सतावत असेल तर अशातच तुम्हाला दररोज अळूच्या पानांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. यामुळे तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल.
ब्लड प्रेशर
अळूच्या पानांमधील पोषक तत्वे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात. याचं सेवन केल्याने तुम्हाला तणावाची समस्या होत नाही.
वजन कमी करण्यासाठी
वजन कमी करण्यासाठीही अळूची पानं फायदेशीर ठरतात. यामध्ये अस्तित्वात असलेलं फायबर मेटाबॉलिज्मला सक्रिय करतं. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पोटाच्या तक्रारींवर फायदेशीर
जर तुम्हाला पोटांच्या कोणत्याही समस्या सतावत असतील तर अळूची पानं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
पूरळ दूर करण्यासाठी गुणकारी
जर तुमच्या शरीरावर कुठेही पूरळांची समस्या जाणवत असेल आणि त्यावर उपचार करून कोणताही फायदा होत नसेल तर एकदा अळूची पानं वपरून पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यासाठी अळूची पानं जाळून त्यांची राख नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून लावा. त्यामुळे पूरळ नाहीसे होण्यास मदत होईल.