सकाळी आंघोळ केल्यानंतर पुन्हा एकदा आपण ताजेतवाने होऊन दिवसभराच्या कामाला सामोरे जाण्यास सज्ज होतो. सकाळची आंघोळ महत्वाची आहेच, पण रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याचे अधिक आरोग्यदायी फायदे आहेत. तुम्हाला विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे. रात्री आंघोळ केल्यामुळे अनेक आरोग समस्यांना दूर ठेवता येते. रात्री अंघोळ करण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया...
शांत झोप लागतेरात्री गरम पाण्याने आंघोळ गेल्याने तुम्हाला छान झोप लागते. जर तुम्ही रात्री १ किंवा २ तास आधी हॉट शॉवर घेतला तर तुम्ही कमीतकमी १० मिनिटं आधी झोपता. तसेच तुम्हाला गाढ झोप लागते. कारण तुमच्या गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या शरिराचे तापमान कमी होते व मेंदुला लवकर झोपण्याचे संकेत मिळतात.
थकवा निघुन जातोझोपण्यापुर्वी हॉट शॉवर घेतल्याने तुमचा दिवसभराचा थकवा दूर होतो आणि अंगदुखीही कमी होते. तुमचे मसल्स रिलॅक्स होतात व तुम्हाला आरामदायक वाटते.
त्वचा हेल्दी होतेतुम्हाला पिंपल्सची समस्या असेल तर रात्री आंघोळ केल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होत नाही. गरम पाण्याने आपल्या त्वचेचे रोमछिद्र ओपन होता. त्वचा चमकदार होते.
केसांची निगा राखली जातेदिवसभराची धुळ आणि माती तुमच्या केसात जमा होते. उष्णतेमुळे तुमच्या डोक्याची त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. पण जर तुम्ही रात्री शॉवर घेत असाल तर तुमचे केस स्वच्छ होतात व डोक्याची त्वचा मोकळा श्वास घेऊ शकते.