HEALTH : गार पाण्याने अंघोळ केल्यास होतील ‘हे’ फायदे !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 12:37 PM
गार पाण्याने अंघोळ केल्यास फक्त फ्रेशच वाटत नाही तर शारीरिक सौंदर्यदेखील टिकवून ठेवता येते.
शारीरिक स्वच्छतेसाठी आपण रोज अंघोळ करतो. अंघोळीसाठी काहीजण कोमट पाण्याचा तर काहीजण गार पाण्याचा वापर करतात. मात्र कोमट पाण्याने अंघोळ करणाऱ्याच्या तुलनेने गार पाण्याने अंघोळ करणारे नेहमी ताजेतवाने असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी दिवसभर फ्रेश राहायचे असेल तर दिवसाची सुरुवात गार पाण्याने अंघोळ करुन करावी. तसेच गार पाण्याने अंघोळ केल्यास फक्त फ्रेशच वाटत नाही तर शारीरिक सौंदर्यदेखील टिकवून ठेवता येते. या शिवाय अजून काय फायदे होतात ते पाहू...* गार पाण्याने अंघोळ केल्यास रक्तप्रवाह सुरुवातीला मंद होतो आणि नंतर उत्तेजित होतो, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्रा या उलट गरम पाण्याने अंघोळ केल्यास रक्त प्रवाह सुरुवातीला उत्तेजित होतो आणि त्यानंतर मंद होतो, जे आरोयासाठी नुकसानकारक असते. * गार पाण्याने अंघोळ केल्यास आळस, थकवा आणि वेदना दूर होतात. झोपही चांगली लागते. त्वचेची खाज, जळजळ दूर होते. यामुळे रक्त स्वच्छ होण्यास मदत होते आणि त्वचेची चकाकी वाढते. * गार पाणी मेंदूला फ्रेश करतो शिवाय कित्येक प्रकारच्या आजारांनाही दूर ठेवते. * नियमित गार पाण्याने अंघोळ केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.* गार पाण्याने अंघोळ केल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत राहते ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते शिवाय ताणतणावही दूर होतो.* यामुळे मेंदूला गारवा मिळतो आणि त्यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो. * रोग प्रतिकारशक्तीदेखील वाढण्यास मदत होते ज्यामुळे संक्रमणापासून बचाव होऊन, सर्दी-खोकला आदी समस्या उद्भवत नाहीत.* थकवा दूर होऊन रात्री झोपही चांगली लागते.