कोरोना काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याची आवश्यकता सगळ्यांनाच आहे. कोरोना व्हायरसच्या जीवघेण्या संक्रमणापासून बचावासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत आहेत. आयुष मंत्रालयानेही कोरोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी काढा पिण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून कोरोना विषाणूंशी लढण्यास मदत होईल. आयुर्वेदात वेगवेगळ्या प्रकारच्या काढ्यांचा समावेश आहे. कारण केमिकल्सयुक्त आरोग्य उत्पादनांच्या तुलनेत काढा परिणामकारक ठरतो. कोरोनासोबतच या पाच आजारांना दूर ठेवण्यासाठी काढा फायदेशीर ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कसा तयार करायचा काढा.
ओवा सगळ्यांचाच स्वयंपाकघरात असतो. खालेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो. काढ्यामध्ये सुद्धा ओव्याचा वापर केला जाऊ शकतो. एक चमचा ओवा, हळद, मध, काळं मीठ, लिंबू किंवा एपल व्हिनेगर, अर्धा लीटर पाणी. सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात हळद आणि ओवा घाला. पाणी उकळून अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करून गाळून घ्या. त्यानंतर त्यात लिंबू, काळं मीठ, मध घाला आणि ओव्यापासून तयार झालेल्या या काढ्याचे सेवन करा.
फायदे
ओव्याचा काढा प्यायल्यानं शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर पडतात. कफ निघून जाण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो. पोटाशी संबंधित विकारांवर ओव्याचे सेवन फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो. ओवा टाकून पाणी प्याल्याने शरीराची पचन क्षमता वाढते.
एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजवून ठेवावा. सकाळी या पाण्यामध्ये एक चमचा मध घालून हे पाणी रिकाम्या पोटी प्यावे. तत खोकला येत असेल तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय गुणकारी आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्यावे. नंतर थोडेसे काळे मीठ घालून ह्या पाण्याचे सेवन करावे.
खोकला येत असेल तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय फायदेशीर आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्यावे. नंतर थोडेसे काळे मीठ घालून ह्या पाण्याचे सेवन करावे.
पित्ताचा त्रास असेल तर ओवा खाणे तुमच्यासाठी हितकारक आहे. यासाठी ओवा, सैधव आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर घ्या.
तसंच पोट साफ होत नसल्यास दररोज दुपारी जेवल्यावर एक ग्लास ताकामध्ये ओव्याची पूड आणि सैंधव टाकून प्या. ज्यामुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल.
अतिसाराच्या त्रासावर ओवा नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. यासाठी जुलाब होत असतील तर दिवसातून दोन वेळा ओव्याचे पाणी प्या.
हे पण वाचा-
लढ्याला यश! आता कोरोनाला शरीरात जाण्यापासून रोखणार एंटीबॉडी इनहेलर, तज्ज्ञांचा दावा
यशस्वी लसीच्या दाव्यावरून WHO नं केली रशियाची पोलखोल; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
भारतातही रशियाची कोरोनावरील लस तयार होण्याची शक्यता, अनेक कंपन्यांचा पुढाकार