काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या पाठीवर लाइट ब्राउन कलरचे दाग दिसून आले होते. तिच्या पाठिवरच्या डागांवरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण त्यानंतर तिच्या पाठिवरच्या डागांचं रहस्य उलगडलं होतं. दिशाच्या पाठिवरचे डाग हे तिने केलेल्या कपिंग थेरपीचे होते. फक्त दिशाच नाही तर अनेक बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी ही थेरपी केली आहे. ही वेदनादायी थेरपी त्वचेसाठी लाभदायक असतेच. पण याव्यतिरिक्त तिचे शरीरासाठीही अनेक फायदे असतात. जाणून घेऊयात नक्की कपिंग थेरपी असते तरी काय? आणि तिचे आरोग्यदायी फायदे...
या थेरपीमध्ये काचेचे छोटे कप गरम केले जातात. त्यानंतर ते पाठिवर ठेवून खेचले जातात. त्यामुळे शरीराच्या मांसपेशींना आराम मिळतो.
थेरपीचे फायदे -
1. ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होणे
ही थेरपी केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होण्यास मदत होते. त्याचबरोबर ही थेरपी रक्तातील विषारी पदार्थ नष्ट करून दूषित तत्व बाहेर काढून टाकते. यामुळे नवीन आणि शुद्ध रक्त तयार होण्यास मदत होते. परिणामी या थेरपीमुळे शरीराचा आजारांपासून बचाव होतो.
2. वेदनांपासून आराम
कपिंग थेरपी केल्यामुळे मायग्रेनमुळे होणाऱ्या वेदना, पाठदुखी, मानेला होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वेदनांनी त्रस्त असाल तर ही थेरपी केल्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
कपिंग थेरपी सर्दी, खोकला आणि अॅलर्जी ठिक करण्यासाठी प्रभावी ठरते. यासोबतच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या थेरपीमुळे मदत होते.
4. शरीरातील सूज कमी करणं
कपिंग शेरपीमुळे शरीरातील गाठी ठिक करून सूज कमी करण्यासाठी मदत होते. याच कारणामुळे आजकाल अनेक खेळाडू या थेरपीचा वापर करताना दिसून येतात.