(Image Credit: 100homeremedies.com)
द्राक्षांवर प्रक्रिया करुन तयार केला जाणारा मनुका आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. मनुक्याचा वापर खासकरुन मीठाई, खीर आणि इतरही काही गोड पदार्थांमध्ये केला जातो. मात्र मनुक्याची टेस्ट तर चांगली आहेच सोबतच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. खासकरुन शारीरिक कमजोरी असलेल्या लोकांनी मनुक्याचे सेवन केले पाहिजे. चला जाणून घेऊया मनुक्याचे आरोग्यदायी फायदे...
1) मनुक्याचे सेवन केल्यास पोटाचा त्रास कमी होतो. जर तुम्हाला लूज-मोशन झाले असतील तर मनुका खावा.
2) जर तुमचं वजन फारच कमी आहे आणि तुम्हाला वजन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी मनुका फायदेशीर ठरेल. यात अधिक प्रमाणात ग्लूकोज आणि फ्रक्टोज आढळतात. ज्यामुळे ताकद मिळते आणि सोबतच वजन वाढण्यासही मदत होते.
3) मनुक्यात मोठ्या प्रमाणात आयर्न सुद्धा आढळतं. रक्त निमिर्तीसाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची आवश्यकता असते. आणि मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आढळतात. त्यामुळे रक्त कमी झाल्यास मनुक्याचं सेवन करायला हवं.
4) मनुक्यात हाडांना मजबूती देणारेही काही तत्व असतात. त्यामुळे मनुके खाल्ल्यास तुम्हाला हाडांच्या त्रासापासून आराम मिळेल.
5) मनुक्यामध्ये अॅंटी-ऑक्सीडेंट गुण आढळतात. या गुणामुळे डोळ्यांच्या दृष्टी चांगली होते.