शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हृदयासह पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरतात भिजवलेले शेंगदाणे, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 5:07 PM

शेंगदाणे पाण्यात भिजवल्याने यामधील न्यूट्रिएंट्स शरीरात पूर्णपणे अब्जॉर्ब होतात.

सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे घरच्याघरी अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. खूप ठिकाणी लहान दवाखाने बंद आहेत. त्यामुळे लहान सहान कारणांसाठी लोक रुग्णालयात जाणं टाळतात. घरी बसून फारशी हालचाल होत नाही.  तसंच गरमीच्या वातावरणात फारशी भूक नसल्यामुळे आहार व्यवस्थित घेतला जात नाही.  परिणामी गॅस, एसिडिटी, पोट साफ न होणे, लठ्ठपणा यासारख्या अनेक समस्या उद्भवत असतात. 

पण घरगुती उपायांचा वापर  करून तुम्ही या समस्यांना स्वतःपासून लांब ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे सांगणार आहोत. इतर ड्रायफ्रुट्सच्या तुलनेत तुम्हाला शेंगदाणे सहज आणि स्वस्त मिळू शकतात. रात्री भिजवलेल्या शेंगदाण्याचं सेवन जर तुम्ही केलं तर  आरोग्य चांगलं राहतं. 

बॉडीबिल्डिंग

जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर सकाळी उठल्यानंतर शेंगदाण्यांचे सेवन फायदेशीर ठरेल. यात मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स असतात.  जर तुम्हाला आपली शरीरयष्टी आकर्षक बनवायची असेल तर  सकाळी उठून शेंगदाण्यांचे सेवन करा. जेणेकरून तुम्ही व्यायाम करताना जास्त स्ट्रेंन्थ वापरू शकता. दूध आणि अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन शेंगदाण्यामध्ये असतात. हे पाण्यात भिजवून खाणे जास्त फायदेशीर असते. शेंगदाणे पाण्यात भिजवल्याने यामधील न्यूट्रिएंट्स शरीरात पूर्णपणे अब्जॉर्ब होतात.

हृदयाचे विकार 

शेंगदाण्यांमध्ये अनेक प्रभावी गुण असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. एका रिसर्चनुसार शेंगदाण्यांमध्ये कार्डियोप्रोटेक्टिव गुण  असतात. कार्डियोप्रोटेक्टिव गुणांमुळे हृदयाच्या रोगांपासून लांब राहता येतं. 

मेंदूचे कार्य

ज्याप्रमाणे ड्राय फ्रुट्सचे सेवन करणं शरीरासाठी लाभदायक ठरतं. त्याप्रमाणेच शेंगदाणे सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शेंगदाण्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. या फॅटी एसिड्समुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. म्हणून सकाळी लवकर उठून अभ्यास करत असलेल्या मुलांना शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. 

त्वचा चांगली राहते

प्रत्येकालाच आपली त्वचा दीर्घकाळ चांगली आणि चमकदार दिसावी असं वाटत असतं. त्यासाठी वेगवेगळ्या ब्यूटी प्रोडक्टसचा वापर केला जातो. पण केमिकल्सयुक्त क्रिममुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते शेंगदाण्यात एंटीऑक्सीडेंट असतात. त्यामुळे जर तुम्ही रोज सकाळी भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन केले तर त्वचा चांगली राहील. ( हे पण वाचा-CoronaVirus News : कोरोनापासून बचावाासाठी 'ही' योगासनं करून फुप्फुसांना ठेवा निरोगी)

पचनक्रिया चांगली  राहते

शेंगदाण्याच्या सेवनाने गॅस, पोट साफ  न होण्याची समस्या दूर होते. कारण शेंगदाण्यात डाएटरी फायबर्स असतात. त्यामुळे सतत लॉकडाऊनमध्ये पोट साफ होण्यास त्रास होत असेल तर रोज सकाळी उठल्यानंतर शेंगदाण्याचे सेवन करा. यामुळे तुमचं शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.( हे पण वाचा-CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या इमारतींमुळे लोकांना 'या' आाजारांचा असू शकतो धोका)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य