मुख्यतः पुजेसाठी वापरण्यात येणारी जास्वंदाची फूलं शरीरासाठीही अत्यंत लाभदायक असतात. आयुर्वेदामध्ये जास्वंदाचं संपूर्ण झाडच औषधी असल्याचं सांगण्यात आलं आहे. याच्या मूळांपासून ते फूलं, पानं या सर्वंच गोष्टी कोणत्या ना कोणत्या आजारांवर गुणकारी ठरतात. फार पूर्वीपासूनचं केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी जास्वंदाच्या फूलांचा उपयोग करण्यात येतो. लाल, सफेद, गुलाबी, पिवळ्या जास्वदांच्या फुलांचा रस हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी फायदेशीर ठरतो. एका संशोधनातून असं स्पष्ट झालं आहे की, जास्वंदाच्या फूलांचा रस कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतो. यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, फॅट्स, मिनरल्स आणि अॅन्टीऑक्सिडंट यांसारखी महत्त्वपूर्ण तत्व असतात. ही सर्व तत्वे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात...
1. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी
जास्वंदाची फूलं सुकवून तयार केलेली पावडर दूधासोबत एक चमचा घेतल्यानं रक्ताची कमतरता दूर होते. त्याचबरोबर एक चमचा खडी साखर आणि पाण्यासोबत घेतल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
2. डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी
डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नियमितपणे जास्वंदाच्या पानांचं नियमितपणे सेवन करा. तसेच याच्या पानांचा चहा तयार करून पिणंही डायबिटीजवर गुणकारी ठरतं. हे झाड तुम्ही घरामध्ये कुंडीतही लावू शकता.
3. केस दाट होण्यासाठी फायदेशीर
जास्वंदाची पानं बारीक करून त्यांची पेस्ट करा. ही पेस्ट डोक्यावर 10 ते 15 मिनिटांपर्यंत लावून ठेवा. त्यानंतर काही वेळानं कोमट पाण्यानं केस धुवून टाका. असं केल्यानं केस दाट आणि चमकदार होतील.
4. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर
जास्वंदाच्या फूलांमध्ये पौष्टीक तत्व असतात. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी, मिनरल्स आणि अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. ही पौष्टीक तत्व श्वासांसंदर्भातील तक्रारी दूर करण्यास फायदेशीर ठरतात.
5. ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी
जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर, जास्वंदाचं झाडं घरी लावणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, हे फूल ब्लड प्रेशरवर गुणकारी ठरते.
6. जखमा लवकर बरं करण्यासाठी
बऱ्याचदा घरातील लहान मुलं कुठेना कुठे धडपडतात. त्यांना अनेकदा जखमदेखील होतात. अशावेळी शरीरावर झालेल्या जखमा लवकर बरं करण्यासाठी जास्वंदाच्या पानांचा उपयोग होतो. याचा लेप जखमांवर लावल्यामुळे जखमा लवकर भरून येण्यास मदत होते.
7. कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर तुम्हाला हृदयाशी निगडीत अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. एका संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की, 1 ग्रॅम जास्वंदाच्या पानांचा रस वजन आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
टिप : हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.