मुंबई : वेदना कोणत्याही असोत त्या सहन करणं त्रासदायकच असतं. त्यात दातांची समस्या असेल आणि वेदना होत असतील तर विचारायलाच नको. दाताची समस्या असेल आणि वेदना होत असतील तर व्यक्ती काही विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता गमावून बसतो.
अशावेळी तुमच्या टूथपेस्टमध्ये मिठ असो वा नसो पण मोहरीचं तेल असायला हवं. कारण दातांच्या दुखण्यासाठी मोहरीचं तेल फारच फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ मोहरीच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे.
मोहरीच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि बीटा कॅरोटीन आढळतात. त्यासोबतच यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आयर्न आणि फॅटी अॅसिड आढळतं. हे तेल आरोग्यासाठी फारच उपयुक्त मानलं जातं. चला जाणून घेऊ आता याचा दातांची वेदना दूर करण्यासाठी कसा उपयोग होतो.
दातांमध्ये वेदना होत असतील तर ज्या ठिकाणी वेदना होत आहे त्या ठिकाणी मोहरीचं तेल लावल्यास वेदना कमी होतात. ज्या पावडरने तुम्ही रोज दात स्वच्छ करता त्यात थोडं मोहरीचं तेल घातल्यास वेदना कमी होतील.
त्यासोबतच कधी कानात अचानक वेदना झाल्या तर अशावेळी मोहरीचं तेल कानात टाकल्यास आराम मिळतो. त्यासोबतच मोहरीचं तेल लसूण टाकून गरम करुन कानात टाकू शकता. यानेही आराम मिळतो.
तसेच मोहरीच्या तेलातील व्हिटॅमिनमुळे त्वचेचीही काळजी घेतली जाऊ शकते. सूर्याच्या किरणांपासून त्वचेचं रक्षण करतं. त्यामुळे घराबाहेर निघण्याआधी मोहरीचं तेल त्वचेवर लावल्यास फायदा होतो.