एका जपानी विद्यापीठाने (Japaneseuniversity) नुकत्याच केलेल्या अभ्यासात असं आढळून आले आहे की, अन्न चावून-चावून (chewing) खाणं आणि डीआयटी (Diet-Induced Thermogenesis) यांचा एकमेकांशी संबंध आहे. वासेदा विद्यापीठाच्या (Waseda University) संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात असा निष्कर्ष समोर आला आहे की, अन्न योग्य प्रकारे चावून खाल्यास शरीर निरोगी राहते. तसंच, हळूहळू आणि योग्य प्रकारे अन्न चावून खाल्याने लठ्ठपणा आणि वजन वाढण्याची समस्या रोखण्यास मदत होते. हे तथ्य मागील शतकातच लोकप्रिय झाले आहे आणि तेव्हापासून अनेक अभ्यासांमध्ये याची पुष्टी झाली आहे.
वासेदा विद्यापीठाच्या डॉ. युकाहमादा (Dr. Yuka Hamada) आणि प्रोफेसर नाओयुकी हयाशी (Professor Naoyuki Hayashi) यांच्या नेतृत्वाखालील या अभ्यासाचे निष्कर्ष 'सायंटिफिक रिपोर्ट्स' (Scientific Reports) जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. चावून-चावून खाल्यामुळे चयापचयाशी (metabolism) संबंधित ऊर्जा खर्च होते आणि आतड्यांची क्रिया वाढते असं दिसून येतं. खाल्ल्यानंतर शरीरातील उष्णता वाढते, ज्याला आहार-प्रेरितथर्मोजेनेसिस (Diet-Induced Thermogenesis) म्हणतात.
डीआयटी हे वजन वाढण्यापासून रोखण्यासाठी ओळखला जाणारा एक घटक आहे. याआधी डॉ. हमादा आणि प्रा. हयाशी यांच्या टीमला असं आढळून आलं होतं की, 'हळूहळू आणि चावून खाण्यामुळे केवळ डीआयटीच वाढत नाही, तर आतड्यांतील ब्लड सर्कुलेशनही वाढतं.' चावून खाल्ल्याने निर्माण होणाऱ्या डीआयटीचा पोटातील पचन आणि शोषणाशी संबंधित वाढीव क्रियांशी असलेला संबंध या अभ्यासाने लक्षात आला आहे. तसंच काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा शोध घेण्यासाठी नवीन वावही यामुळे मिळतो.
पुढील अभ्यासाची गरज प्रा. हयाशी म्हणाले, 'आम्ही या वस्तुस्थितीबद्दल अनिश्चिततेच्या स्थितीत होतो की हळूहळू खाल्ल्यानंतर जे अन्नपचन संस्थेत प्रवेश करते, त्या प्रमाणात डीआयटी वाढते. आता आम्हाला इतर पैलू जाणून घेणं आवश्यक आहे.'
अन्न चावून-चावून खाल्ल्याने लठ्ठपणा टाळण्यास मदत होते. या अभ्यासानुसार, हळूहळू आणि चावून खाण्यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहतं. प्रत्येक व्यक्तीची खाण्या- पिण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही जण सावकाश खातात तर काही जणांना भराभर जेवण्याची सवय असते. प्रत्येक घास चावून खाल्ल्यास वजन कमी होण्यास बरीच मदत मिळते. संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून सुद्धा हे समोर आले आहे. त्यामुळे तुम्हाला जर भराभर जेवण्याची सवय असेल, तर ती वेळीच बदलण्याची गरज आहे.