Drumstick Health Benefits : हिरव्या भाज्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे एक्सपर्ट नेहमीच सल्ला देतात की, हिरव्या पालेभाज्या नियमित खाव्या. पण यात एक अशी भाजी आहे जी शरीराला खूप जास्त फायदे मिळवून देते. ती म्हणजे शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा लोक आवडीने खातात, पण त्यांना याचे फायदे अजिबात माहीत नसतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शेवग्याच्या शेंगांना आयुर्वेदातही खूप महत्वाचं म्हटलं आहे. शेवग्याच्या शेंगा, या झाडाची पाने आणि फुलांचीही भाजी केली जाते. यापासून शरीराला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, आयरन, मॅग्नेशियम, व्हिटामिन-ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतात.
हाडं मजबूत होतात
शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शिअम, आयर्न आणि भरपूर व्हिटॅमिन्स असतात. यामुळे हाडांना मजबुती मिळते. त्यामुळे त्याचा रस किंवा दूधासोबत शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर ठरतं. म्हणूनच मुलांच्या हाडांची वाढ सुधारण्यासाठी त्यांच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा.
रक्त शुद्ध होतं
शेवग्याच्या पानांप्रमाणेच त्यांच्या शेंगामध्ये देखील रक्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे त्या शरीरात अॅंटी-बायोटीक एजंट म्हणून काम करतात. याने रक्तातील दुषित घटक वाढल्याने होणारा अॅक्नेचा त्रास, त्वचाविकार कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात.
शुगर कंट्रोल
शेवग्याच्या शेंगांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी मधूमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पित्ताशयाचे कार्य सुधारण्यासही शेंग़ा फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरीराचे कार्य आणि स्वास्थ्यही सुधारते.
इन्फेक्शनपासून बचाव
शेवग्याच्या पानांमध्ये, फूलांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल तत्व असतात. यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून तुमचा बचाव होण्यास मदत होते. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात आढळणारे व्हिटामिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते. तसेच शरीरातील फ्री रॅडीकल्सचा धोका कमी करण्यासही शेवग्याच्या शेंग़ा फायदेशीर ठरतात.