Honey Cinnamon Water : घरोघरी सहज उपलब्ध असणाऱ्या दालचीनी पावडरचे अनेक उपयोग आहेत. मसाल्यांमध्ये दालचीनी मिक्स करून जेवणाची लज्जत तर वाढवतेच, पण त्यांच्यामध्ये असणारे अनेक घटक आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी ठरतात. अशाप्रकारे मधाचेही आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मध आणि दालचीनी यांचे मिश्रण करून ते पाण्यासोबत एकत्र घेतल्यानंतर आरोग्यास काय फायदा होतो पाहूयात…
पोटासाठी ठरेल फायदेशीर-
मधात दालचीनीची पूड एकत्र करून याचे चाटण तयार करून घ्यावं. हे चाटण एकत्र न संपवता पाण्याात मिसळून त्याचं हळू हळू सेवन करा. या गुणकारी चाटणामुळे घसा, फुफ्फुसांच्या आजारांपासून लांब राहता येतं याशिवाय पोटाच्या अल्सरचीही समस्या दूर होण्यास मदत होते.
त्वचेच्या समस्या दूर होतात -
त्वचेवर पुळ्या येणं ही सामान्य गोष्ट असली तरी तोंडावर सतत पुळ्या आल्यानं संपूर्ण लूक बिघडतो. त्वचेवर गंभीर स्वरुपाचं संक्रमण होण्याची शक्यता असते. अनेकदा पोट व्यवस्थित साफ नसल्यामुळे पुरळ येतात. एक्टिव्ह बॅक्टेरियांमुळे समस्या अधिक वाढत जाते. मध आणि दालचीनीचे दररोज सेवन केल्यानं या समस्येपासून आराम मिळू शकतो.
कॉलेस्ट्रॉल कमी होतं -
बदलती जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच व्यायामाच्या अभावामुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. शरीरातील कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी मध आणि दालचिनी पावडरचे पाणी अतिशय उपयोगी पडते. या पाण्याच्या सेवनाने हृद्यरोगाचा धोका टळतो.