Pumpkin seeds benefits : भोपळ्याच्या भाजीचं सेवन भारतातील लोक आवडीने करतात. या भाजीचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. ही भाजी खाण्यासाठी टेस्टी तर असतेच सोबतच आरोग्यालाही याने अनेक फायदे मिळतात. पण तुम्ही लक्ष दिलं असेल की, भाजी बाजारातून घेताना त्यात बीया असतात, पण घरी आणल्यावर भाजी करताना त्या बीया फेकून देतात. पण जर या बियांचे फायदे तुम्हाला समजले तर तुम्ही या बीया कधीच फेकणार नाही. चला जाणून घेऊ या बियांचे फायदे...
डायबिटीसमध्ये फायदे
डायबिटीसच्या रूग्णांनी भोपळ्याच्या बियांचं सेवन केलं पाहिजे. कारण या भरपूर प्रमाणात फायबर असतं जे टाइप डायबिटीसमध्ये आराम देण्याचं काम करतं. तसेच या बियांमध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा असतात जे डायबिटीसमध्ये रामबाण उपाय मानले जातात. याने ब्लड शुगल लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते.
इम्यूनिटी होते बूस्ट
कोरोना काळापासून इम्यूनिटी बूस्ट करण्यावर लोकांचा फार भर असतो. इम्यूनिटी बूस्ट केल्यावर वेगवेगळ्या आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
टेंशन होईल दूर
आजकाल लोकांवर कामाचं, परिवाराचं आणि आर्थिक प्रेशर खूप वाढलं आहे. ज्यामुळे लोक नेहमीच टेंशन आणि डिप्रेशनमध्ये असतात. मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी या भोपळ्याच्या बीया खूप फायदेशीर ठरतात. कारण यात मॅग्नेशिअम असतं ज्याने मेंदू शांत ठेवण्यास मदत मिळते. त्याशिवाय या बीयांमध्ये झिंक आणि व्हिटॅमिन बी सुद्धा असतं ज्याने टेंशन दूर केलं जाऊ शकतं.
लागेल चांगली झोप
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना झोप न येण्याची समस्या होते. अनेक उपाय करूनही त्यांना चांगली झोप लागत नाही आणि रात्रभर जागीच राहतात. अशात भोपळ्याच्या बीया तुमची ही समस्या दूर करू शकतात. याच्या सेवनाने इन्सोमेनिया दूर होतो.