शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

Health Care: आहारात साखरेला गुळाचा पर्याय वापरावा का? आरोग्य शास्त्र काय सांगते पहा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 4:20 PM

Health Care: गूळ खाण्याचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत, पण जेवढे फायदे तेवढेच तोटेदेखील आहेत, त्यामुळे गूळ किती प्रमाणात खावा ते जाणून घ्या.

पूर्वी काहीही गोड बातमी आली की साखर भरवून तोंड गोड केले जाई. मात्र आता, साखर पाहताच लोक हातभर लांब पळतात. सगळ्यांनीच साखरेचा आणि पर्यायाने वाढत्या वजनाचा तसेच त्यामुळे उध्दभवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींचा धसका घेतला आहे. पण त्यामुळे साखरेला गुळाचा पर्याय वापरणे कितपत योग्य ठरेल? आरोग्य शास्त्रात काय नमूद केले आहे याबद्दल डॉ. अमित भोरकर काय माहिती देतात ते जाणून घेऊ. 

उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन- B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात. याठिकाणी गुळ खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे. 

👉🏽 हिमोग्लोबिन वाढवते-  ऍनिमिया दूर करण्यासाठी गुळ खाणे फायदेशीर असते. १०० ग्रॅम गुळामध्ये ११ मिलिग्रॅम लोहाचे प्रमाण असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास गूळ फार उपयुक्त असते.

👉🏽 रक्तदाब नियंत्रित ठेवतो- गूळ खाण्यामुळे ब्लडप्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. 

👉🏽पचनशक्ती सुधारते- गुळामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच गूळ खाण्यामुळे नियमित पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

👉🏽 स्त्रियांसाठी उपयुक्त- सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी गुळ खाणे उपयुक्त असते. कारण मासिक पाळी, अयोग्य आहार यांमुळे स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी आढळते. यासाठी वयात येणाऱ्या मुली, मासिक पाळी असणाऱ्या स्त्रियांनी गुळाचा आहारात जरूर समावेश करावा. गरोदरपणातही लोहाचे खूप महत्त्व असते. यासाठी गरोदर स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरीनंतरही गूळ हितकारी असतो.

आयुर्वेदात गुळाचे खूप महत्व आहे. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधेही गुळाबरोबर दिली जातात. आयुर्वेदातही गुळ खाण्याचे फायदे अनेक सांगितले आहेत. गुळ हे वातनाशक असून गुळ सुंठीबरोबर खाल्ल्यास वाताचे शमन होऊन मज्जावह संस्थेला म्हणजे नर्व्हस सिस्टीमला बल देते. जुना गुळ खाल्यास कफनाशनाचे कार्य होते. गुळामुळे दमा, खोकला यासारखे कफाचे विकार कमी होण्यास मदत होते. शरीरातील थकवा दूर करण्यासही गुळ उपयोगी ठरते.

साखर खाणे चांगले की गुळ खाणे चांगले .. ? 

साखरेच्या तुलनेत गुळ पौष्टिक असतो. आयुर्वेदानेही साखरेपेक्षा गूळ हा श्रेष्ठ मानला आहे. साखरेत केवळ कॅलरीज असतात आणि याशिवाय कोणतेही उपयुक्त पोषकतत्वे साखरेत नसतात. त्यामुळे साखरेचे पदार्थ अति खाण्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढून वजन व चरबी वाढत असते. त्यामुळे हृदयविकार व डायबेटीसचा धोकाही वाढत असतो. तर गुळामध्ये लोह (आयर्न), मॅग्नेशियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन- B अशी अनेक आवश्यक पोषकतत्वे असतात. तसेच शरीरात गुळाचे शोषण धिम्यागतीने होते. त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढत नाही. त्यामुळे साखर आणि गुळाची तुलना करता, आरोग्यासाठी गुळचं खाणे हितकारक असते. 

 गुळ खाण्यामुळे होणारे नुकसान :

- अधिक प्रमाणात गुळ खाण्यामुळे वजन वाढू शकते. वजन अधिक वाढण्यामुळे डायबेटीस, हृद्यविकार होण्याचा धोकाही वाढू शकतो.  - गूळ अधिक खाण्यामुळे पोटात जंत होण्याचा त्रास होऊ शकतो. आमवात किंवा rheumatoid arthritis चा त्रास असल्यास गुळ खाणे टाळावे. कारण यात sucrose चे प्रमाण अधिक असल्याने या त्रासात सांध्यातील सूज अधिक वाढू शकते.- गुळ अधिक खाण्यामुळे रक्तातील साखर (ब्लड शुगर) वाढू शकते. त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी गूळ अधिक खाणे टाळावे. मधुमेह असणाऱ्यानी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गुळाचा समावेश करावा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स