शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

Health Care Tips: आपण रोज जेवतो, पण निरोगी आयुष्यासाठी जेवणाचे 'हे' नियम पाळतो का? स्वतःलाच उत्तर द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 7:00 AM

Health : आपण सेवन करत असलेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर व्हावे यासाठी स्वतःला शिस्त लावून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही महत्त्वाचे नियम-

'हेल्थ इज वेल्थ' अर्थात आरोग्य हीच संपत्ती आहे. आपले मन भगवंताच्या चरणी रुजू करायचे असेल, तर आरोग्याच्या कुरबूरी असून चालणार नाही. आरोग्य सुदृढ असेल, तर मन शांत राहील. यासाठी सर्व संतांनीदेखील आध्यात्माबरोबर आरोग्याला महत्त्व दिले. समर्थ रामदासांनी तर हनुमंताची देवळे उभारून त्याच्या शक्ती, युक्ती आणि भक्तीचा आदर्श घालून दिला. युवकांनी तर बलोपासना केलीच पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. आजचा समाज सशक्त आणि सुसंस्कृत घडवायचा असेल, तर व्यायाम, आध्यात्म याबरोबरच आपण जे अन्नग्रहण करतो, त्याबाबतीत महत्त्वाचे नियम पाळले पाहिजेत.

  • ताजे अन्न खावे.
  • मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट या सहाही चवी जेवणात असाव्यात.
  • जेवणात चावून, फोडून खाण्यासारखे पदार्थ, चाटण्यासारखे, पिण्यासारखे पातळ पदार्थ याा समावेश असावा.
  • भूक लागल्यावरच जेवावे.
  • दोन जेवणांमध्ये किंवा खाण्यामध्ये किमान चार तासांचे अंतर असावे.
  • प्रत्येक घास चावून खावा.
  • जेवणात अधून मधून घोट घोट पाणी प्यावे.
  • जेवण तिखट, कडू, तुरट चवींनी संपवावे.

  • जेवण आंबट, गोड चवींनी सुरू करावे.
  • योग्य न्याहारी आणि दुपारचे जेवण घ्यावे. रात्रीचे जेवण हलके घ्यावे.
  • जेवताना काटेचमच्यांनी न जेवता हाताने जेवावे.
  • जेवणाआधी ईश्वराचे स्मरण करावे आणि सकस अन्न दिल्याबद्दल त्याचे आभार मानावेत. 
  • जेवण झाल्यावर ताटात एक थेंब सोडून आचमन करून भोजनयज्ञ पूर्ण करावा.
  • गोड आणि पचायला जड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत.
  • खाण्याच्या क्षमतेसनुसार दोन भाग घन द्रव्य, एक भाग पातळ द्रव्य, एक भाग मोकळा असे ताटाचे स्वरूप असावे.
  • शांतचित्ताने, न बोलता, सावकाश जेवून ताटाला नमस्कार करून मगच उठावे.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न