HEALTH : गंभीर आजाराने त्रस्त आहे ‘ही’ स्टार सिंगर, बेस्ट फ्रेंडने डोनेट केली किडनी !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 9:31 AM
काही दिवसांपासून ‘ल्युपस’ नावाच्या गंभीर आजाराने त्रस्त होती, जाणून घ्या सविस्तर...!
हॉलिवूड सिंगर सेलिना गोमेज बऱ्याच कालावधीपासून आपल्या फॅन्सला दिसत नव्हती. याबाबत एका फॅन्सने तिला विचारले असता, सेलेनाने थक्क करणारे कारण सांगितले. सेलेना गोमेजने सांगितले की, ‘तिने नुकतीच किडनी ट्रान्सप्लांट केली आहे.’ सेलेना काही दिवसांपासून ‘ल्युपस’ नावाच्या गंभीर आजाराने त्रस्त होती. ल्युपसच्या समस्येमध्ये शरीराची इम्युनिटी पॉवर कमकुवत होते. त्यामुळे ती बऱ्याच कालावधीपासून लाइमलाइटपासून दूर होती. २५ वर्षीय सेलेनाचा नवा अल्बम रिलीज होण्यासाठी तयार आहे, मात्र या कारणाने त्याला प्रमोट करु शकत नाही. * सेलेनाने बेस्ट फ्रेंडचे मानले आभार सेलेनाने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला असून तिने म्हटले आहे की, ‘मला माहित आहे की, माझे फॅन्स विचार करीत असतील की मी इतक्या दिवसापासून दिसत का नाही आहे. माझा नवा म्यूझिक अल्बमदेखील येणार असून ज्याला मी आता प्रमोट करु शकत नाही. मी माझ्या फॅन्सला सांगू इच्छिते की, माझी नुकतीच किडनी ट्रान्सप्लांट केली असून मी हळुहळू रिकव्हरदेखील होत आहे.’ सेलेनाने पुढे म्हटले आहे की, ‘मी प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की, यासाठी माझी फॅमिली आणि माझ्या डॉक्टर्सच्या टीमने माझी पूर्णत: काळजी घेतली आहे. मी त्यांचे अगदी मनापासून आभार मानू इच्छिते.’ यावेळेस सेलेनाने आपली बेस्ट फ्रेंड फे्रं सिया रेसाचाही खूप आभार व्यक्त केला आहे. तिने स्वत:ची एक किडनी सेलेनाला दिली असून, याबाबतीत सेलेनाने म्हटले आहे की, ‘मी माझ्या प्रिय फ्रेंडला खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते. माझ्या या फ्रेंडने मला खूपच मोठे गिफ्ट दिले आहे. तिने माझ्यासाठी स्वत:च्या किडनीचे बलिदान दिले आहे, मी खूपच नशिबवान आहे. आय लव्ह यू सिस्टर.’ सेलेनाने असेही म्हटले आहे की, ल्युपस आजाराविषयी खूपच चुकीचे समज पसरले आहेत आणि याविषयी अधिक माहिती प्रत्येकाने घ्यावी असेही तिने आवाहन केले आहे.