HEALTH : झोपण्यापूर्वी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 7:45 AM
रात्री घेण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळेही आपल्या झोपेवर परिणाम होतो हे क्वचितच लोकांना माहित असेल. यासाठी रात्री काही पदार्थांपासून चार हात लांबच राहावे. तर नेमके कोणते पदार्थ आपल्या झोपेवर परिणाम करतात याबाबत जाणून घेऊन.
-Ravindra Moreबऱ्याच लोकांना रात्री व्यवस्थित झोप न येण्याच्या समस्येने ग्रासले आहे. यासाठी ते एकतर औषधी घेतात किंवा झोप येण्यासाठी काही घरगुती उपाय शोधतात. मात्र रात्री घेण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळेही आपल्या झोपेवर परिणाम होतो हे क्वचितच लोकांना माहित असेल. यासाठी रात्री काही पदार्थांपासून चार हात लांबच राहावे. तर नेमके कोणते पदार्थ आपल्या झोपेवर परिणाम करतात याबाबत जाणून घेऊन. अल्कोहोलबऱ्याचजणांचे म्हणणे आहे की, मद्यपान केल्याने झोप चांगली लागते, मात्र तसे नसते. याने झोप येण्याच्या क्रियेवर विपरित परिणाम होतो. सोबतच मद्यपान केल्याने लघवी जास्त लागते, ज्यामुळे आपणास रात्री वेळोवेळी उठावे लागते. एकदा नशा उतरल्याने आणि झोपमोड झाल्याने पुन्हा झोप येणे कठीण होते. कॅफिन(चहा/कॉफी)जर आपणास रात्री चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर वेळीच बदला. यात असलेले कॅफिन झोपेवर विपरित परिणाम करते. यामुळे आपणास झोप लागत नाही. जड खाणे जड खाल्ल्याने पचायला वेळ लागतो ज्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. या कारणाने झोपही येत नाही आणि संपूर्ण रात्र विनाझोप व्यतित होते. यासाठी झोपण्यापूर्वी जड खाणे टाळावे. लसुन लसुन जरी आरोग्यासाठी फायदेशीर असेल तरी रात्री झोपण्याअगोदर याचे सेवन टाळावे, कारण याच्या सेवनाने झोपेवर परिणाम होत असतो. लसुन खाऊन त्वरित झोपल्याने गॅसची समस्या उद्भवते, ज्याने झोपमोड होते. गोड पदार्थ गोड पदार्थ खाल्ल्याने साखरेचे प्रमाण वाढते आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते. याकारणाने झोपेवर परिणाम होतो.