HEALTH : जेवणानंतर गार पाणी पिताय का? सावधान !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 12:18 PM
गार पाणी जरी आपल्या पोटाला आणि गळ्याला थंडावा देत असले तरी जेवल्यानंतर गार पिणे शरीरासाठी हानिकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. प्रत्येक जण शरीराच्या गारव्यासाठी गार पाण्याचा वापर करतो. गार पाणी जरी आपल्या पोटाला आणि गळ्याला थंडावा देत असले तरी जेवल्यानंतर गार पिणे शरीरासाठी हानिकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा सरळ आपल्या पचनक्रियेवर परिणाम होऊन विविध विकारांसह शरीराची रोग प्रतिकारशक्तीही कमी होते.बऱ्याचजणांना जेवल्यानंतर गार पिण्याची सवय असते, मात्र जेवल्याच्या लगेच नंतर गार पाणी पिणे पित्ताशयासाठी हानिकारक ठरते. आमच्या शरीराचा सामान्य तापमान 98.6 डिग्री फॉरेनहाइट अर्थात ३७ डिग्री सेल्सियस असते. आमच्या शरीरासाठी २०-२२ डिग्री सेल्सियस तापमानाचे पाणी उपयुक्त आहे याहून अधिक गार पाणी पिणे हानिकारक ठरेल. काय दुष्परिणाम होतात ते पाहू. बद्धकोष्ठतागार पाणी पिल्याने शरीरात तयार होणारे पाचक रसाचे तापमान कमी होते. ज्यामुळे जेवण पचण्यास अडचणी निर्माण होतात. शिवाय गार पाण्याने आतड्यादेखील संकुचित होऊन जातात ज्यामुळे बद्धकोष्ठतेचीही समस्या निर्माण होते. ज्यांना ही समस्या असेल त्यांनी गार पाणी पिणे टाळावे.टॉन्सिल्सगार पाणी पिल्यानंतर ते थोड्या वेळेसाठी तोंडातच राहते आणि सामान्य तापमानावर आल्यावरच गळ्यातून खाली उतरतं. अधिक वेळेपर्यंत गार पाणी पित राहिल्याने टॉन्सिल्सची समस्या उत्पन्न होते.Also Read : ALERT : जेवताना टीव्ही पाहणे आरोग्यासाठी हानिकारक !