शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

​Health : स्टार्सची ‘ही’ वाईट सवय आपणासही आहे का? सोडवा ‘योगा’ द्वारे !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 9:28 AM

काही योगा तज्ज्ञांच्या मते, योगामुळे धूम्रपानपासून लांब न ठेवता शरीरावर होणारे दुष्परिणाम सुद्धा लांब ठेवू शकतो, जाणून घ्या सविस्तर...!

-रवीन्द्र मोरे बहुतांश स्टार आपले फिटनेस आणि सौंदर्य टिकवण्यासाठी बरीच मेहनत घेत असतात. हेल्दी डाएट, व्यायाम हा त्यांच्या रुटीनचा महत्त्वाचा भाग असतो. मात्र काही वाईट सवयी अशा आहेत, ज्यापासून ते स्वत:ला दूर करू शकलेले नाहीत. उदाहरणार्थ, अभिनेत्री तनुजा आपल्या स्मोकिंगच्या सवयीमुळे त्रासलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात त्या सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसुद्धा चेन स्मोकर्सपैकी एक आहे. स्मोकिंगच्या सवयीमुळे अनेकदा तो वादात अडकला आहे. काही वर्षांपूर्वी जयपूरमधील एका क्रिकेट सामन्यादरम्यान शाहरूख स्टेडियममध्ये स्मोक करताना आढळला होता. शाहरूख खान, तनुजा यांच्याव्यतिरिक्त राणी मुखर्जीसह बऱ्याच स्टासंर्ना खासगी आयुष्यात सिगारेट ओढण्याची सवय आहे. या सेलिब्रिटींचेच अनुकरण करुन आजची तरुणाईदेखील धूम्रपानाला बळी पडली आहे, विशेषत: उच्च शिक्षण घेणारे तरुण या व्यसनाच्या जाळ्यात मोठ्याप्रमाणात अडकले आहेत. धूम्रपानचे काय दुष्परिणाम आहेत. हे आपल्या सवार्ना माहिती आहे. तरी ही सवय सुटत नाही. मात्र एका अध्ययनाद्वारे, योगाच्या माध्यमातून धूम्रपानाची सवय सोडविली जाऊ शकते, असे स्पष्ट झाले आहे. काही योगा तज्ज्ञांच्या मते, योगामुळे धूम्रपानपासून लांब न ठेवता शरीरावर होणारे दुष्परिणाम सुद्धा लांब ठेवू शकतो.धूम्रपान सोडण्यासाठी बाजारात अनेक रासायनिक उपाय उपलब्ध आहेत. पण, धूम्रपान रोखण्यासाठी याचा वापर एवढा प्रभावशाली नाही. सिगारेटमधून निघणाऱ्या धुरामुळे शरीराला धोका असणारे पदार्थ शरीरात प्रवेश करून रक्त गोठायला सुरुवात होते. त्यामुळे याचा परिणाम हृदय आणि रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील आॅक्सिजन रक्तातील अभिसरण कमी करते. धूम्रपानच्या दुष्परिणामापासून वाचण्यासाठी योगा हा एक उत्तम पर्याय आहे. सर्वांगासन (शोल्डर स्टँड), सेतू बंधासन (ब्रिझ मुद्रा), भुजंगासन (कॉबरा पोझ), शिशुआसन (बाल पॉझ) या सर्व योगासनांमुळे स्मोकिंगपासून सुटका होण्यास मदत होते. धूम्रपानामुळे श्वसनावर होणारे परिणाम रोखण्यासाठी योगा हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थांना लांब ठेवले जाते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्याचबरोबर तणाव आणि चिंतेपासून दूर ठेवून आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतो.  Also Read : ​​Fitness : 'या' कारणाने शिल्पा शेट्टी अजून आहे फिट !                   : Health : ​गरोदरपणात अवश्य करावित ही ‘५’ योगासने !