HEALTH : आपणास वडील व्हायचयं का? तर वापरा या १० वस्तू !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2017 8:50 AM
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीची (नपुसकत्व) समस्या वाढतच आहे. मात्र वेळीच आपण योग्य जीवनशैलीचा अवलंब आणि हेल्दी फूड्सचा वापर केल्याने या समस्येपासून सुटका मिळून स्पर्म (विर्य) काउंट आणि क्वालिटीदेखील वाढविली जाऊ शकते.
-रवीन्द्र मोरे सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीची (नपुसकत्व) समस्या वाढतच आहे. मात्र वेळीच आपण योग्य जीवनशैलीचा अवलंब आणि हेल्दी फूड्सचा वापर केल्याने या समस्येपासून सुटका मिळून स्पर्म (विर्य) काउंट आणि क्वालिटीदेखील वाढविली जाऊ शकते. संशोधनानुसार १० असे फूड्स आहेत ज्याने आपली वडील होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. * लसुन रोज सकाळी लसुनच्या ३/४ पाकळ्या खाव्यात. यातील एलिसिन नावाच्या कंपाउंड मेल आॅर्गनमध्ये ब्लड फ्लो वाढवितो. * अक्रोड रोज एक मुठभर अक्रोड खा. यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स मेल आॅर्गन्समध्ये ब्लड फ्लो करण्यास मदत करते. * टोमॅटोटोमॅटोला आॅलिव्ह आॅइलमध्ये शिजवून खा. यातील ‘लायकोपीन’ स्पर्म काउंट, क्वालिटी आणि स्ट्रक्चरला उत्तम करते. * भोपळाच्या बिया रोज एक मुठभर भोपळाच्या बिया खा. यातील जिंक आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे टेस्टोस्टेरोन आणि स्पर्म काउंट वाढते. * डार्क चॉकलेट रोज डार्क चॉकलेट खा. यातील एलअरजिनाइन नावाचे एमिनो अॅसिड स्पर्मची मात्रा आणि गुणवत्ता वाढविते.* अंडेरोज ब्रेकफास्टमध्ये दोन अंडी खा. यात प्रोटिन आणि विटॅमिन ‘ई’ भरपूर प्रमाणात असल्याने स्पर्मच्या निर्मितीसाठी खूपच साहाय्यक आहे. * केळी रोज सकाळ-संध्याकाळ एक -एक केळी खा. यातील ब्रोमिलेन नावाचे एंजाइम विटॅमिन ‘बी’ स्टॅमिना, एनर्जि आणि स्पर्म काउंट वाढविते. * डाळिंबरोज एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस प्यावा. तुर्कीमध्ये केलेल्या संशोधनानुसार याने स्पर्म काउंट वाढण्यास मदत होते. * गाजर रोज कोशिंबिरमध्ये (सलाद) गाजर खावे. यातील विटॅमिन ‘ए’ स्मर्पची निर्मिती करण्यासाठी उपयुक्त आहे. * पालकरोज जेवणात पालकचा समावेश करावा, किंवा ज्यूस प्यावा. यातील फोलिक अॅसिडमुळे स्पर्मची गुणवत्ता वाढण्यास मदत होते.