HEALTH: लाल मिरची खा, आयुष्यमान वाढवा !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 6:45 PM
लाल मिरचीच्या सेवनाने मृत्यूदर १३ टक्के कमी होतो जो मुख्यत: हृदय रोग किंवा स्ट्रोकच्या कारणाने होतो. जे लोक नेहमी लाल मिरचीचे सेवन करतात त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते..
जर आपणास आपले आयुष्यमान वाढवायचे असेल तर लाल मिरची खा. यामुळे कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे आयुष्य वाढते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. संशोधकांच्या निष्कर्षानुसार लाल मिरचीच्या सेवनाने मृत्यूदर १३ टक्के कमी होतो जो मुख्यत: हृदय रोग किंवा स्ट्रोकच्या कारणाने होतो. जे लोक नेहमी लाल मिरचीचे सेवन करतात त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. मात्र, संशोधकांना त्या प्रणालीचा तपास नाही लागला ज्यामुळे लाल मिरची खाल्ल्याने आयुष्यमान वाढते. अमेरिकेच्या वरमोंट विश्वविद्यालयाचे मुस्तफा चोपान यांनी सांगितले की, ‘ट्रांसिएंट रिसेप्टर पोटेंसियल (टीआरपी) चॅनल्स, जे कॅप्सीचीनसारख्या एजंटांचे प्राथमिक रिसेप्टर्स असतात, आणि हे मिरचीचे प्रमुख तत्व आहेत. यांची जीवनकाळ वाढण्यासाठी काही भूमिका असू शकते. चोपान यांनी सांगितले की, कॅप्सीचीनचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि धमन्यांमध्ये रक्त प्रवाहाला नियंत्रित करण्यात सेल्युलर आणि आण्विक तंत्रामध्ये आपली भूमिका निभवितो. सोबतच यात मायक्रोबियल विरोधी गुण असतात, जे संभवत: आतड्यांच्या मायक्रोबायोटात बदल करुन अप्रत्यक्षपणे त्या व्यक्तीचे जीवनमान वाढविण्यास मदत करते. मसाल्याचे पदार्थ आणि मिरचीला शेकडो वर्षांपासून विविध रोगांवरील उपायांसाठी लाभदायक मानण्यात येत आहे. या संशोधनात सुमारे १६ हजार अमेरिकन व्यक्तींनी सुमारे २३ वर्षापासून संशोधन केले आहे.