शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

शरीरातील 'या' गोष्टीची कमतरता देते गंभीर आजारांचे संकेत, तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या याबाबत अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 3:29 PM

डॉक्टर उमा नायडू यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी फोलेट हे सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक का आहे यामागील कारणं स्पष्ट केली आहेत. त्या लिहितात की विशेषतः हिरव्या भाज्यांमध्ये फोलेट मुबलक प्रमाणात असते.

सामान्यतः लोकांना हिरव्या पालेभाज्या खायला आवडत नाहीत. तर काही लोकांना हिवाळ्यात पालेभाज्या खायला जास्त आवडतं. असो, प्रत्येक माणसाची पदार्थांबाबतचे चोचले आणि आवड वेगवेगळी असते. पण फोलेट हे शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे यात शंका नाही. डॉक्टर उमा नायडू यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी फोलेट हे सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक का आहे यामागील कारणं स्पष्ट केली आहेत. त्या लिहितात की विशेषतः हिरव्या भाज्यांमध्ये फोलेट मुबलक प्रमाणात असते.

हिरव्या भाज्या सेरोटोनिन आणि डोपामाइन सारखे न्यूरोट्रांसमीटर तयार करण्यास मदत करतात, जे तुमचा मूड स्थिर करतात. याचा अर्थ असा की तुम्ही नियमितपणे जितक्या ताज्या पालेभाज्यांचे सेवन कराल तितके तुम्हाला अधिक आनंदी व फ्रेश वाटेल.फोलेटच्या कमतरतेमुळे होऊ शकतात या समस्या

फोलेटबाबत फार कमी लोकांनी ऐकले आहे, असे डॉक्टर नायडू सांगतात. फोलेटला व्हिटॅमिन बी-9 असेही म्हणतात. हे एक रसायन (chemical) आहे जे शरीरातील खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करते. फोलेटच्या कमतरतेमुळे नैराश्य (depression), स्मरणशक्ती कमी होणे (memory loss), थकवा (Fatigue), स्किझोफ्रेनिया आणि इतर अनेक आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. फोलेटच्या कमतरतेमुळे मेंदूच्या पेशींचे (brain cells) नुकसान होऊ शकते. मुख्यतः हिप्पोकॅम्पसमध्ये. हिप्पोकॅम्पस ही एक महत्त्वाची मेंदूची रचना म्हणजेच ब्रेन स्ट्रकचर आहे, जे की लर्निंग आणि मेमरी म्हणजेच स्मरणशक्तीसाठी खूप महत्त्वाचे असते.

फोलेटने संपन्न आहेत या भाज्यातज्ञांनी हिरव्या पालेभाज्यांच्या काही चांगल्या स्त्रोतांची लिस्ट बनवली आहे, ज्यात फोलेट किंवा व्हिटॅमिन बी-9चे प्रमाण भरपूर चांगले असते.

हिरवे वाटाणेतज्ज्ञांचे म्हणणे आहे की हिरव्या वाटाण्यामध्ये सुद्धा फोलेट आढळते. विशेषतः हिवाळ्यात हिरव्या वाटाण्यापासून भाज्या आणि स्नॅक्स बनवले जातात. आलू मटर ही भाजी बहुतेक भारतीय घरांमध्ये सर्रास बनवली जाते. अशा परिस्थितीत भाज्यांव्यतिरिक्त अनेक रेसिपी बनवण्यासाठी अनेक प्रकारे वाटाण्याचा वापर आपण करू शकतो. यामुळे तुमच्या शरीरातील फोलेटची कमतरता भरून निघेल. केळी आणि पालकच्या भाजीतही फोलेट खूप चांगल्या प्रमाणात आढळते. तज्ज्ञांच्या मते, 4 ते 6 कप रोज सेवन केल्यास शरीरातील फोलेटची कमतरता दूर होऊ शकते.

पालकपालकची भाजी हिवाळ्यात जास्त प्रमाणात मिळते. हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच बाजारात सर्वत्र पालकची भाजी पाहायला मिळते. लोक हिवाळ्याच्या संपूर्ण काळात पालकपासून विविध स्नॅक्स, भाज्या, सूप बनवतात.

राजमाराजमा खाण्यास जितका स्वादिष्ट आहे तितकाच तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. किडनी बीन्सच्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, ते हृदय निरोगी ठेवण्यासाठी, पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी, मधुमेह आणि अगदी कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्याचवेळी फोलेटसोबतच प्रोटीन, कॅल्शियम, फायबर यासारखे इतर अनेक आवश्यक पोषक तत्व राजमामध्ये असतात. हे पोषक घटक राजमाला आरोग्यासाठी अधिक फायदेशीर बनवतात.

बीन्सफोलेटने समृद्ध असणा-या बीन्समध्ये फायबर आणि इतर पोषक घटक देखील असतात. यामुळे बीन्स हे आरोग्यासाठीही खूप चांगले आहे.

ब्रोकोलीहिरव्या भाज्यांबद्दल बोलायचं झालं तर असं होऊच शकत नाही की त्यात ब्रोकोलीचे नाव येणार नाही. फ्लॉवरसारखी दिसणारी ब्रोकोली ही अतिशय पौष्टिक भाजी आहे. फोलेट सोबतच ब्रोकोलीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे इतर अनेक पौष्टिक घटक असतात. आरोग्यासाठी ब्रोकोलीच्या फायद्यांविषयी सांगायचे तर त्यात अँटी-डायबेटिक, अँटी-ओबेसिटी, अँटी-कॅन्सर, अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ब्रोकोली ही हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त भाजी आहे.

हिरवे मूगगरोदर स्त्रियांना गरोदरपणात फोलेट नावाच्या एका पोषक तत्वाची मोठी गरज भासते. गरोदरपणाच्या निर्णायक काळात या पोषक तत्वाची गरज असल्याने स्त्रियांना फोलेटयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. पोटातील अर्भक पूर्णपणे विकसीत होण्यासाठी हे पोषक तत्व अतिशय गरजेचे असते. खासकरून गरोदर स्त्रियांना पहिल्या तिमाहीत फोलेटची गरज खूप भासते. अशावेळी मोड आलेले मुग उपयुक्त ठरू शकतात. हिरवे मुग हा फोलेटचा उत्तम स्त्रोत मानला जातो. म्हणून गरोदर स्त्रियांनी आठवड्यातून किमान २ वेळा तरी मोड आलेले हिरवे मुग अवश्य खावेत. जर काही शंका असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचे सेवन करावे.

एक्सपर्ट्सनी सांगितले फोलेटचे फायदे!

 

 

 

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स