सोरायसिस क्रॉनिक म्हणजे पुन्हा पुन्हा होणारा ऑटोइम्यून रोग आहे. हा रोग शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो. या रोगामुळे त्वचेवर लाल आणि पांढऱ्या रंगांचे डाग येतात. ही समस्या जास्तीत जास्त डोकं, हात-पाय, तळहात, पायांचे तळवे या ठिकाणांवर होते. हा रोग जेनेटिक आहे, पण काही कारणांनीही हा रोग होऊ शकतो.
हा रोग होण्याला वातावरणातील बदलही कारणीभूत ठरु शकतो. हा रोग कुणालाही कधीही होऊ शकतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलतं वातावरण ही समस्या वाढवू शकतात. या समस्येबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमजही आहेत. चला जाणून घेऊया काय आहे की, समस्या...
1) जास्तीत जास्त लोकांना केवळ हेच माहीत आहे की, सोरायसिसमध्ये त्वचेवर खाज आणि लाल फोडं येतात. पण काय तुम्हाला हे माहीत आहे की, चेहऱ्यावर येणाऱ्या लाल फुऱ्यांमुळे वेदनाही होतात आणि यांचा आकारही वाढू शकतो.
२) भारतात हा आजार प्रत्येक वर्षी १० मिलियन लोकांपेक्षा अधिक लोकांना प्रभावित करतो. पण लोक या आजाराबाबत जास्त जागरूक नाहीयेत.
३) अनेकांना असं वाटतं की, हा आजार गरमीच्या दिवसात अधिक होतो. पण तसं नाहीये. हिवाळ्यातही हा आजार होतो. उलट हिवाळ्यात तुमची स्थिती गंभीर होऊ शकते. हिवाळ्यात या आजारामुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते.
४) ही समस्या केवळ पुरूषांनाच नाहीतर महिलांनाही होऊ शकते. इतकेच नाहीतर कोणत्याही वयोगटातील लोकांना ही समस्या होऊ शकते. पण प्रामुख्याने ही समस्या वयस्कर लोकांना जास्त होते.
५) अनेकजण या आजाराबाबत कुणाकडेही काहीही सांगत नाहीत. त्वचा झाकण्यासाठी लांब कपडे परिधान करतात. हा आजार लपवून ठेवतात. पण तसं न करता त्यांनी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यायला हवेत.