Health : दाढ दुखत आहे, करा हा घरगुती उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2017 12:15 PM
दाढदुखीची समस्या खूपच त्रासदायक असते. यावेळी येणाऱ्या कळा चांगल्या सुदृढ व्यक्तीलासुद्धा सहन होत नाही. यासाठी दाढदुखीची समस्या टाळण्यासाठी वेळीच काळजी घेणे गरजेचे असते.
दाढदुखीची समस्या खूपच त्रासदायक असते. यावेळी येणाऱ्या कळा चांगल्या सुदृढ व्यक्तीलासुद्धा सहन होत नाही. यासाठी दाढदुखीची समस्या टाळण्यासाठी वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. काय काळजी घ्याल?* दातांची निगा राखण्यासाठी जेवण झाल्यानंतर न विसरता चूळ भरावी. * सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत. * जास्त थंड, गरम आणि कडक पदार्थ खाणे टाळावे. * लहान मुलांना चॉकलेट, गोड पदार्थ शक्यतो कमी प्रमाणात द्यावे किंवा देणे टाळावे.काय उपाय कराल?* दाढ दुखत असल्यास तुळशीची ५ ते १० पाने स्वच्छ धुवून, कुटून त्याचा रस काढावा आणि त्यात कापराच्या ३ ते ५ वड्या मिसळाव्यात. * कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दुखणाऱ्या दाढेत ठेवावेत. त्यामुळे दाढदुखी कमी होण्यास मदत होते. * दाढदुखीवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन दाढ नेमकी का दुखते, यावर योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. Also Read : HEALTH : दातांची कीड अशी घालवा !