HEALTH : निरोगी राहायचय? तर रिकाम्यापोटी खा हे ‘सात’ पदार्थ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2017 12:55 PM
रात्रीच्या झोपेनंतर सकाळी आपण काय खातो यावर संपूर्ण दिवसाची दिनचर्या अवलंंबून असते. यासाठी सकाळी रिकाम्यापोटी काय खावे याबाबत जाणून घेऊया.
-Ravindra Moreआज प्रत्येकाला वाटते की, आपण हेल्दी राहावं. मात्र बदलती जीवनशैलीमुळे आरोग्याकडे नकळत दुर्लक्ष होते. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आहारा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. कोणता आहार कधी घ्यावा, याचे पथ्य ठरलेले आहे. रात्रीच्या झोपेनंतर सकाळी आपण काय खातो यावर संपूर्ण दिवसाची दिनचर्या अवलंंबून असते. यासाठी सकाळी रिकाम्यापोटी काय खावे याबाबत जाणून घेऊया.* कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने पचनसंस्था स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते. तसेच वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.* कढीपत्त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच इन्सुलिनच्या निर्मितीचेही कार्य सुधारते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यातील उपमा किंवा पोह्यातील कढीपत्ता बाजूला काढू नका.* अॅनिमियाचा त्रास कमी करण्यासाठी सकाळी किमान एक खजूर रिकाम्यापोटी खावा. त्यातील आयर्न घटक हिमोग्लोबीन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.* रात्री बेदाणे / काळे मनुका पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्यापोटी घेतल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्यात उच्चप्रतीचे फायबर असल्याने पोट साफ होण्यास मदत होते.* दोन टीस्पून कोरफडीचा गर दोन टीस्पून जिऱ्याच्या पावडर सोबत प्यायल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते. सोबत अर्धा ग्लास गरम पाणी प्यावे. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.* ग्लासभर पाण्यात जिरं मिसळलेले पाणी प्यायल्यास हृद्याचे कार्य सुधारण्यास तसेच रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यातील पोटॅशियम घटक निरोगी स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.* लसणाच्या तीन पाकळ्या चघळून त्यावर कपभर लिंबूपाणी प्या. हा प्रयोग रिकाम्यापोटी केल्यास लठठपणा कमी करण्यास मदत होते. लसणामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.