शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

HEALTH : ​दिवसभर एनर्जेटिक राहायचे असेल तर करा हे बदल !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 11:13 AM

आपण आपल्या वाईट सवयी बदलून आणि डायटमध्ये काही खाद्यपदार्थांचा समावेश करुन एनर्जी लेवल वाढवू शकता आणि आपणही दिवसभर सेलेब्ससारखे ऊर्जावान राहू शकता. जाणून घ्या सविस्तर...!

सेलिब्रिटींच्या लाइफस्टाइलचा विचार केला तर  दिवसभर शुटिंगसाठी इकडे-तिकडे धावपळ, कामाचा ताण, त्यातच स्वत:साठी आणि फॅमिलीसाठी वेळ आदी सर्व गोष्टी फॉलो करणे म्हणजे तारेवरची कसरतच. एवढ्या गोष्टी सांभाळण्यासाठी ते एनर्जेटिक असायला हवेच, आणि ते असतातही. कारण त्यांचे लाइफस्टाइल सर्वसामान्यांसारखे नसून थोडे वेगळे असते म्हणून ते नेहमी एनर्जेटिक असतात. धावपळीच्या मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये बहुतांश लोक योग्य डायट फॉलो करु शकत नाही आणि वेळेवर जेवण होत नसल्याने आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात. शिवाय शरीरास योग्य पोषण मिळत नसल्याने शरीराच्या फिटनेसवर प्रतिकुल परिणाम होतो आणि आपली एनर्जी लेव्हल घटू लागते, ज्यामुळे कामदेखील व्यवस्थित होत नाही. अशा स्थितीत आपण आपल्या वाईट सवयी बदलून आणि डायटमध्ये काही खाद्यपदार्थांचा समावेश करुन एनर्जी लेवल वाढवू शकता आणि आपणही दिवसभर सेलेब्ससारखे ऊर्जावान राहू शकता.   अ‍ॅनर्जेटिक राहण्यासाठी काय कराल?* दिवसभर अ‍ॅक्टिव्ह राहायचे असेल तर ब्रेकफास्ट करणे कधीही टाळू नका. सकाळी ब्रेकफास्ट करणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे त्याला प्राधान्य द्यावे. ब्रेकफास्टमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त सेवन केल्यास दिवसभर एनर्जी लेव्हल उच्च राहील. प्रोटीनसोबतच विटॅमिन आणि मिनरल्सवरदेखील भर द्यावा. ज्यामुळे दिवसभर आपल्या शरीरास भरपूर प्रमाणात एनर्जी मिळू शकते.  * दिवसभर एनर्जेटिक राहायचे असेल तर बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा. आपण कामानिमित्त बाहेर पडत असाल तर बाहेरच्या खाण्याचे असंख्य पर्याय उपलब्ध असतात, मात्र सोबत घरचेच खाद्यपदार्थ असावेत आणि त्यांचेच सेवन करावे. यामुळे आपल्या पैशांची तर बचत होईल शिवाय घराचे हेल्दी जेवणही मिळेल आणि आपला अन्य आजारांपासून बचाव होईल.      * कामानिमित्त बाहेर जात असाल तर सोबत पाण्याची बॉटल असावी. शरीर डिहायड्रेड होऊ नये म्हणून दर दोन तासांनी किमान एक ग्लास पाणी सेवन करावे. यामुळे दुपारीदेखील एनर्जी लेव्हल टिकून राहते.  * जंक फुडच्या सेवनाने लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे आजार उद्भवू शकतात, त्यामुळे आपली एनर्जी लेव्हल घटते. यासाठी जंक फूड सेवन करणे टाळावे.