रात्री झोपताना अनेकांना आपला फोन उशीजवळ ठेवण्याची सवय असते. पण ही समय महागात पडू शकते. उशीजवळ फोन ठेवून झोपल्याने केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. जर तुम्हीही अशा प्रकारची चूक करत असाल तर काळजी घ्या अन्यथा खूप त्रास होऊ शकतो. फोन उशीखाली ठेवून झोपल्यामुळे काय दुष्परिणाम होतात ते जाणून घेऊया..
झोपताना फोन किती अंतरावर ठेवावा?
तुम्ही जिथे झोपत आहात तिथून दूर किंवा दुसऱ्या खोलीत तुमचा फोन ठेवावा. तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता ती म्हणजे तुम्ही ज्या खोलीत झोपत आहात त्या खोलीच्या दुसऱ्या बाजूला तुमचा फोन ठेवा. तुम्ही फोन टेबलवरही ठेवू शकता. जर तुम्ही तुमचा फोन बेडवर ठेवून झोपत असाल तर त्याचा एअरप्लेन मोड ऑन करा. यामुळे तुमचं जास्त नुकसान होणार नाही. फोनमुळे नुकसान होऊ शकतं.
उशीजवळ फोन ठेवून झोपण्याचे तोटे
स्ट्रेस
उशीजवळ फोन ठेवून झोपल्याने खूप जास्त टेन्शन येतं, स्ट्रेस निर्माण होतो. फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे ब्रेन मसल्स डॅमेज होतात.
एंग्जायटी
फोनमुळे व्यक्ती स्ट्रेस आणि एंग्जायटी तसेच डिप्रेशनसारख्या गंभीर आजारांना बळी पडू शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. या कारणांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी फोन स्वतःपासून दूर ठेवावा.
स्लीप क्वालिटी
तुमचा फोन एअरप्लेन मोडवर असल्यास, फोनवर वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे तुमची झोपेची गुणवत्ता म्हणजेच स्लीप क्वालिटी खराब होणार नाही. चांगली झोप येण्यासाठी फोन उशीजवळ ठेवू नका.
सर्वाइकल
जेव्हा तुम्ही तुमचा फोन तुमच्या उशीजवळ ठेवून झोपता तेव्हा तुम्हाला सर्वाइकल कॅन्सरचा धोका आहे.
मायग्रेन
फोन उशीजवळ ठेवून झोपल्याने मायग्रेनचा त्रास होतो. फोनचा एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आरोग्याची नीट काळजी घ्या. काही समस्या असल्याचं डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.