Health : फक्त फिट दिसणे नव्हे तर स्वस्थही असायला हवे -यामी गौतम !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2017 1:11 PM
काय आहे यामीचा फिटनेस मंत्रा, जाणून घ्या...!
फक्त फिट दिसणेच नव्हे तर स्वस्थ राहणेही आवश्यक आहे, असे बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचे म्हणणे आहे. यामीच्या मते, ‘कलाकारांना फक्त बाहेरून फिट दिसण्यापेक्षा आतून स्वस्थ व सक्रीय राहणे आवश्यक आहे. एखाद्या पेशासाठी फिट दिसण्यापेक्षा स्वस्थ व फिट राहणे आपल्या लाईफस्टाईलचा भाग असायला हवा.’मुंबईत मागील आठवड्यात स्विमवेअर ब्रँड स्पीडो इंडिया व स्पड्रो अॅक्वाफिट (अंडरवॉटर, व्हर्टिकल, फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम) साठी क्रॉसफिट अॅक्वा अॅरोबिक्स प्रशिक्षक पूजा अरोरा यांच्यासोबत उपस्थित काबिल चित्रपटाची नायिका यामीचे मत आहे की कोणत्याही प्रकारचा फिटनेस त्यांना प्रेरित करतो. यामीने सांगितले, ‘वेळोवेळी आपल्या फिटनेसवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.’फिटनेस मंत्राविषयी विचारल्यावर यामीने सांगितले, ‘सक्रीय व नियंत्रित वजन प्रशिक्षण हाच मंत्र आहे. परंतु जेवणाचा याच्याशी घनिष्ट संबंध आहे. शरीर संतुलनासाठी आहार योग्य हवा.’यापूर्वी यामीने राम गोपाल वर्मांच्या सरकार-३ या सिनेमामध्ये काम केले आहे. यामी प्रामुख्याने हिंदी व तेलुगू भाषांमधील चित्रपटांत भूमिका करते. २०१२ सालच्या विकी डोनर ह्या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. विकी डोनरमधील भूमिकेसाठी तिला झी सिने पुरस्कार व आय.आय.एफ.ए. पुरस्कार मिळाले. तेव्हापासून तिने ॲक्शन जॅक्सन, बदलापूर, टोटल सियापा, जुनुनियत इत्यादी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.Also Read : VIDEO : ...तर हे आहे बिपाशा बसुचे फिटनेस रहस्य ! : Fitness secret of Deepika : दीपिकासारखे सपाट पोट हवे असेल तर जाणून घ्या फिटनेस रहस्य !