Health : फ्लॅट टमीसाठी फक्त १५ मिनिट !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 12:31 PM
आपल्या दिवसातून फक्त १५ मिनिट द्यायचे आहेत आणि आपण स्लिम आणि फिट दिसाल.
बहुतांश अभिनेत्र्यांचा आपली टमी फ्लॅट दिसण्यावर जास्त भर असतो. त्यासाठी जिम, योगा बरोबरच डायटवर पूर्ण लक्ष के्रद्रित करतात. त्यांच्यासारखीच फ्लॅट टमी आपलीदेखील असावी अशी बऱ्याच तरुणींची अपेक्षा असते. मात्र यासाठी जिममध्ये जाऊन मेहनत करावी लागणार. पण आम्ही आपणास असे काही उपाय सांगत आहोत जे फॉलो केल्यास आपणास जिम जाण्याची किंवा खूप मेहनत घ्याची गरज नाही. आपल्या दिवसातून फक्त १५ मिनिट द्यायचे आहेत आणि आपण स्लिम आणि फिट दिसाल. * पाठीवर लेटून दोन्ही पाय उंच करा. दोन्ही पाय एकाच वेळी गुडघ्याने पोटाकडे वळवा. ५ सेकंद हाताने पायांना पकडून ठेवा. पाय सरळ करा. १० वेळा हा व्यायाम करा. * पाठीवर लेटून दोन्ही पाय स्ट्रेट वर करा. हळू-हळू उजवा पाय खाली आणून सरळ करा. मग डावा पाय खाली आणत उजवा पाय पुन्हा उंच करा. कातरी प्रमाणे हा व्यायाम १० वेळा करा.* पाठीवर लेटून पाय स्ट्रेट वर करा. काही सेकंदासाठी थांबून पाय खाली आणत ४५ डिग्रीचा कोण बनवा. काही सेकंद असेच राहू द्या. ही प्रक्रिया १० वेळा करा.* पाठीवर लेटून जा. हात डोक्याखाली ठेवून पायाने सायकल चालवा. यासोबत हाताच्या कोपऱ्याने गुडघे टच करण्याचा प्रयत्न करा. १० वेळा रिपीट करा.* पाठीवर लेटून श्वास आत घेऊन दोन्ही हात कानाच्या बाजूने सरळ करा. नंतर अर्ध उठून दोन्ही हाताने पायांना व्ही पोझिशन बनवून ही प्रक्रिया १० वेळा रिपीट करा.* पालथे लेटून जा. आता पायाच्या पंज्यावर आणि तळ हाताच्या साहाय्याने शरीर उचला. १० सेकंद याच स्थितीत राहा. १० वेळा ही प्रक्रिया करा.* एका कुशी लेटून जा. एक हात आणि पायाच्या साहाय्याने शरीर उचलून ३० सेकंद अशा स्थितीत राहा. १० वेळा ही प्रक्रिया करा.