HEALTH : जाणून घ्या ‘ग्रीन कॉफी’चे आश्चर्यकारक फायदे !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2017 9:16 AM
ग्रीन कॉफीतील अनेक तत्वे आरोग्यासाठी लाभदायक आहेत. ग्रीन कॉफी रंग व गुणवत्तेच्या तुलनेत सामान्य कॉफीपेक्षा फार वेगळी असून याचे परिणामही वेगळे आहेत.
थोडासाही थकवा जाणवला की आठवण येते ती कॉफी पिण्याची. अशा काही गुणांमुळे लोकं कॉफी आवडीने पितात तर दुसरीकडे त्यातील कॅफिनमुळे कॉफी आरोग्यासाठी घातक असल्याचे जाणकार सांगतात. असे असले तरी नव्या संशोधनानुसार ग्रीन कॉफीतील क्लोरोजेनिक अॅसिड मेटॅबॉलिज्म सुरळीत करते वजन कमी करण्यास मदत होते. याचबरोबर ग्रीन कॉफीतील अनेक तत्वे आरोग्यासाठी लाभदायक आहेत. ग्रीन कॉफी रंग व गुणवत्तेच्या तुलनेत सामान्य कॉफीपेक्षा फार वेगळी असून याचे परिणामही वेगळे आहेत. काय फायदे आहेत * ग्रीन कॉफी भूक कमी करून कॅलरीवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे ही वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. यामुळे अनेक आॅनलाईन विक्रेते ग्रीन कॉफी विकत आहेत. * ग्रीन कॉफीच्या सेवनाने शुगर नियंत्रणात राहते. नियमित स्वरूपात ग्रीन कॉफीचे सेवन मधुमेह बरा करण्यासाठी फायद्याचे आहे. * ग्रीन कॉफीमुळे शरीरात गाठी तयार होण्याची शक्यता कमी होत असल्याने कॅन्सरसारख्या रोगावरही ग्रीन कॉफी लाभदायक आहे. * यात मोठ्या प्रमाणात अँटी आॅक्सिडंट असतात. हे अँटी आॅक्सिडंट तणाव, डिप्रेशन अशा मानसिक आजारांना दूर ठेवण्याचे काम करतात.