Health : कमी झोप घेणारे देतात बऱ्याच आजारांना आमंत्रण !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2017 7:01 AM
सहा तासापेक्षा कमी झोप घेणाऱ्यामध्ये मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या निर्माण होऊन त्यांच्यात येणारे मृत्यूचे प्रमाण दुपटीने वाढत असल्याचे एका संशोधनातून जाहीर करण्यात आले आहे.
सहा तासापेक्षा कमी झोप घेणाऱ्यामध्ये मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या निर्माण होऊन त्यांच्यात येणारे मृत्यूचे प्रमाण दुपटीने वाढत असल्याचे एका संशोधनातून जाहीर करण्यात आले आहे. मेटाबॉलिक सिंड्रोम मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांचे कॉम्बिनेशन आहे. एका अभ्यासानुसार मेटाबॉलिक सिंड्रोमने त्रस्त लोक जर सहा तासापेक्षा जास्त झोप घेतली तर त्यांचा स्ट्रोकच्या कारणाने मृत्यू होण्याचा धोका १.४९ टक्कयाने वाढतो तर ६ तासापेक्षा कमी झोप घेणाऱ्याना हृदय रोग आणि स्ट्रोकच्या कारणाने मृत्यू होण्याचा धोका २.१ टक्कयाने वाढतो. यूनिव्हर्सिटी आॅफ पेंसिलवेनियाचे सहायक प्राध्यापक आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक,जूलियो फर्नांडीस-मेंडोजा यांनी सांगितले की, ‘जर आपण हृदय रोगाने त्रस्त असाल तर आपल्या झोपेची काळजी घेणे खूपच आवश्यक आहे आणि जर निद्रानाश या विकाराने त्रस्त असाल तर या धोक्यापासून वाचण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. Also Read : Health : आपणासही रात्री झोप येत नाही का?