HEALTH : उन्हाळ्यात बनवा घरगुती आरोग्यदायी शीत पेय !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 11:22 AM
उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून प्रत्येकजण शीत पेय पिण्याकडे वळतात. मात्र बऱ्याचदा बाहेरचे पदार्थ खाणे-पिणे आरोग्याच्या दृष्टिने हानिकारक ठरते. त्यामुळे आरोग्यास फायदेशीर असे काही पेय आहेत जे आपण घरीच बनवून शकतो.
-Ravindra Moreउन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून प्रत्येकजण शीत पेय पिण्याकडे वळतात. मात्र बऱ्याचदा बाहेरचे पदार्थ खाणे-पिणे आरोग्याच्या दृष्टिने हानिकारक ठरते. त्यामुळे आरोग्यास फायदेशीर असे काही पेय आहेत जे आपण घरीच बनवून शकतो.फळांमध्ये विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असल्याने विविध फळांचा वापर करुन शीत पेय तयार करु शकता. शिवाय फळांच्या रसात अजून काही पदार्थ मिक्स करून त्याची चव जास्त वाढविता येऊ शकते. यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि त्वचेच्याही समस्या उद्भवत नाही. * टोमॅटो व काकडी :साहित्य : तीन कप टोमाटोचा ज्यूस, दोन चमचे लिंबाचा रस, दोन लवंगा, एक दालचिनी काडी, एक लहान कांदा किसून, अर्धा कप काकडीचा कीस, चवीपुरते मीठ, तीन चमचे साखर व बर्फाचे क्युब्ज.कृती : कांदा व काकडी किसून घ्यावी, बर्फ सोडून सर्व घटक पदार्थ एकत्र करून फ्रीजमध्ये एक तासभर ठेवावेंत व नंतर गाळून घ्यावे. सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून, प्रत्येक ग्लासात घालून बफार्चे क्युब्ज घालावे व सर्व्ह करावे.* कलिंगडचे सरबत :साहित्य : एक कलिंगड, चवीपुरते मीठ, दालचिनी/ मिरपूड , साखर एका लिंबाचा रस.कृती : कलिंगड कापून त्याच्या लालबुंद, मधल्या भागातील गर स्कुपने (गोल आकाराचा चमचा आईस्क्रीम काढण्याचा ) काढून एका बाउलमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवावे आणि मग उरलेल्या कलिंगडचा लाल भाग अगदी बारीक चिरून त्याच्या बिया काढून, त्याचा रस काढून तो गाळून घ्यावा. त्यात मीठ, साखर, दालचिनी पूड किंवा मिरपूड, लिंबाचा रस घालून तासभर फ्रीज मध्ये ठेऊन थंड करावे. सर्व्ह करतेवेळी प्रत्येक ग्लासात थंड सरबत काढून ठेवलेल्या कलिंगडच्या तुकड्यातील एक दोन तुकडे त्या सरबतात घालून प्यायला द्यावे. या सरबतात बर्फाचे क्यूब्ज घालू नये.* सफरचंदाचे पेय :साहित्य : २५० ग्राम सफरचंद, चवीपुरती साखर, एक लिंबू, मीठ.कृती : सफरचंद स्वच्छ धुवून सालासकट बारीक चिरून घ्यावी. साखरेवर लिंबाची साल किसून घ्यावी व ती सफरचंदात मिसळावी. तीन कप उकळीचे पाणी त्यात ओतावे व झाकण घालून ठेवावे. थंड झाल्यावर गाळून घ्यावे. चवीपुरती साखर घालावी. मीठ रुचीप्रमाणे घालावे किंवा नाही घातले तरी चालेल. सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून बर्फ घालून लहान लहान ग्लासातून सर्व्ह करावे.* जिंजरेल :साहित्य: एक किलो प्रत्येकी बेताच्या आकाराचा एक कप आल्याचा रस व लिंबाचा रस, त्याच कपाने मोजून चार कप पाणी.कृती : साखर व पाणी एकत्रित करून साखर पाण्यात चांगली मिसळू द्यावी. ते पानी पाच ते सात मिनिटे उकळावे. गार झाल्यावर आल्याचा रस व लिंबाचा रस गाळून व्यवस्थित मिसळावा. हे टिकाऊ करण्यासाठी दोन चमचे पाण्यात अर्धा चमचा पोटेशियम मेटाबायसल्फाईड गाळून ते मिश्रण त्या रसात मिसळावे. सर्व्ह करताना उंच ग्लासमध्ये दोन चमचे करड बर्फ व थोडा जिंजरेल सोडा किंवा पाणी गाळून द्यावे.Also Read : HEALTH : उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स पिताय, सावधान !