Health : वजन कमी करण्यासाठी बटाट्याचा असा करा वापर !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 8:11 AM
एका नव्या संशोधनानुसार बटाट्याचा थोड्या वेगळ्या पद्धतीने वापर केल्यास वजन कमी करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. जाणून घेऊया कसा वापराल?
बहुतांश सेलिब्रिटी वजन वाढू नये म्हणून डायटमध्ये अशा पदार्थांचा समावेश करतात ज्यामुळे त्यांच्या शरीरात फॅट वाढणार नाही. त्यात भातापाठोपाठ ‘बटाटा’देखील ते आहारातून वगळतात. मात्र एका नव्या संशोधनानुसार बटाट्याचा थोड्या वेगळ्या पद्धतीने वापर केल्यास वजन कमी करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. जाणून घेऊया कसा वापराल?* बटाटा न तळता सेवन केल्यास त्यामुळे शरीरात कॅलरीज वाढवत नाही. न तळलेला १० ग्रॅम उकडलेला बटाटा खाल्ल्यास केवळ १० ग्रॅम कॅलरीज मिळतात. त्यामुळे आहारात किंवा ब्रेकफास्टला वाटीभर ( १०० ग्रॅम) वाफवलेला बटाटा खाल्ल्यास तुमचे पोट तर भरेल पण सोबतीला आवश्यक १०० कॅलरीज मिळतील. * इतर भाज्यांच्या तुलनेत बटाटा हा झटपट आणि सहज शिजतो. मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही तो डीप फ्राय किंवा तुपामध्ये तळावा. चटपटीत मात्र हेल्दी ग्रेव्हीमध्ये किंवा शॅलो फ्राय केलेल्या व्हेजिटेबल कटलेट्समध्ये, पोटॅटो सलाडमधून आहारात घ्यावा. परंतू पोटॅटो चिप्स, आलू पराठा किंवा पोटॅटो सॅन्डव्हिच हे वजन वाढवण्यास अधिक मदत करतात. त्यामुळे वजन घटवताना बटाटा आहारातून टाळण्याऐवजी तो स्मार्टली आहारात घ्या. म्हणजे त्यातील अधिकाधिक पोषणद्रव्यं तुमच्या आहारात येतील. परिणामी हेल्दी मार्गाने तुमचे वजनही आटोक्यात राहण्यास मदत होते * बटाट्यामध्ये कॉम्प्लॅस काबोर्हायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे साखरेचे प्रमाण विशिष्ट काळाने आणि विशिष्ट प्रमाणात रिलिझ होते. त्यामुळे बटाटे खाल्ल्यानंतर तुमचे पोट लवकर भरते. यामुळे तुमच्या भूकेवर नियंत्रण राहते. परिणामी वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.* १०० ग्रॅम बटाट्यातून सुमारे १.६ ग्रॅम प्रोटीन्स आणि केवळ ०.१ ग्रॅम फॅट्स व ०.४ ग्रॅम फायबर मिळते. बटाट्यामधून आयर्न आणि व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात मिळते. तसेच पोटॅशियम आणि सोडीयमचादेखील पुरवठा होतो. त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांसाठी वजन घटवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. पाव, तांदूळ यांच्या तुलनेत बटाट्याचा ग्ल्यासमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे मधूमेहींसाठीदेखील बटाटा हा उत्तम पर्याय आहे.