HEALTH : पुरुषांनो, चुकूनही करु नका या १० गोष्टींकडे दुर्लक्ष !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 10:47 AM
अशा काही शारीरिक समस्या आहेत, ज्या सुरुवातीला सामान्य वाटतात, मात्र थोड़े दुर्लक्ष केल्यास रूद्र रूप धारण करतात....
-Ravindra Moreबदलत्या जीवनशैलीचा आज प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होत असून प्रत्येकजण आरोग्यासंबंधी एखाद्यातरी समस्येने ग्रासले आहे. धावपळीत आपण नेमके या समस्यांकडे दुर्लक्ष करतो आणि आरोग्यावर नको तो परिणाम करुन घेतो. वेळीच जर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. मग पुरुषांनी नेमक्या कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये, याबाबत जाणून घेऊया. * ताणतणावकामातील ताणतणाव वाढल्याने डिप्रेशन, एंक्झायटी आणि ह्रदयासंबंधीच्या तक्रारी सुरू होतात. * लघवीसंबंधी समस्यालघवीच्या वेळी जळजळ, वेळोवेळी लघवी होणे, त्याजागी त्रास होणे या समस्यांमुळे मधुमेह, किडनी किंवा यकृताचा विकार होऊ शकतो. * पाठीचे दुखणेसततची पाठदु:खी किडनी स्टोनच्या कारणानेही होऊ शकते. * तोंडाची दुर्गंधी तोंडाची स्वच्छता न केल्याने तोंडाची दुर्गंधी तर येते शिवाय मधुमेह, यकृत, किडनीच्या समस्या,.अॅसिडिटी आदी विकार होण्याची शक्यता असते. * कमजोरी / थकवारक्तामधील लोहाची कमी, ह्रदयविकार, थॉयराइडसारख्या समस्यांमुळे आपणास थकवा येऊ शकतो. * जास्त घाम येणेथॉयराइड आणि मेटाबॉलिज्मच्या समस्येने आपणास जास्त घाम येऊ शकतो. * डोकेदु:खीसततच्या डोकेदु:खीने शरीरातील पाण्याच्या कमरतेशिवाय ह्रदय आणि मेंदूशी संबंधीत एखादी समस्या निर्माण होऊ शकते.* छाती किंवा खांदेदु:खीकमजोरी,थकवा, श्वास घेण्याच्या समस्येबरोबरच छाती किंवा खांदेदु:खीचा संबंध थेट ह्रदयविकारापर्यंत असू शकतो. * त्वचेची खाजत्वचेच्या विकाराबरोबरच यकृत, कि डनीची समस्या किंवा मधुमेहामुळेही त्वचेला खाज येऊ शकते. * मोशन प्रॉब्लेम(शौचासंबंधी समस्या)लूज मोशन, मोशनमध्ये बदल, अॅसिडिटी किंवा पोट फुलणे आदी समस्या कॅन्सरमुळेही होऊ शकतात. Also Read : पुरुषांनी ‘या’ ७ टेस्ट कराव्याच !