HEALTH : पुरुषांनो, तारुण्य टिकविण्यासाठी "हे" खा !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2017 12:21 PM
जसजसे वय वाढले की आपले तारुण्य हिरावले जाते, आणि म्हातारे दिसणे कुणालाच आवडत नाही. जर आपणास आपले तारुण्य टिकवायचे असेल तर या पदार्थांचा नक्की वापर करा..
-Ravindra Moreत्वचेची काळजी घेण्यासाठी मुली नेहमी तत्पर असतात, त्यासाठी त्या विविध उपायदेखील करतात. मात्र त्यामानाने मुले काही प्रमाणात कमी पडतात. कारण मुलांना यासाठी खूप वेळही देता येत नाही. मात्र आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश केला तरी चेहऱ्यावर तारुण्याची झळाळी येऊ शकते. आजच्या सदरात आम्ही आपणास काही पदार्थांविषयी माहिती देत आहोत. हे पदार्थ खाल्ल्याने तारुण्य वाढण्यास मदत होईल. भोपळा भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असल्याने यामुळे तुमचे तारुण्य खूप काळ टिकून राहते. यामधील गुणधमार्मुळे सुरकुत्या नाहीशा होण्यास मदत होते. रेड वाईन रेड वाईनमधील अँटी एजिंग तत्त्व तुमची त्वचा सुंदर बनवतात. किवी किवीमध्ये मोठ्या प्रमाणात असणारे अँटीआॅक्सिडंट व व्हिटॅमिन सी तुम्हाला चिरतरुण राहण्यास मदत करेल. हे फळ महाग असले तरी याचे फायदेही तितकेच अधिक आहेत. डार्क चॉकलेट दररोज थोडेसे डार्क चॉकलेट खाल्ल्याने हानिकारक किरणांपासून संरक्षण मिळते. आॅलिव्ह आॅलिव्ह तेल खाल्ल्याने व त्वचेवर लावल्याने त्वचेचा पोत सुधारतो.