शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

आयएमएने कोरोना उपचारांबाबत पुरावे मागिल्यानंतर, अखेर आरोग्य मंत्रालयाकडून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 1:20 PM

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाच्या उपचारांवर प्रोटोकॉल्स प्रयोग आणि वैद्यकिय चाचण्यानंतर लोकांना योगा आणि आयुष यांचा अवलंब करण्याबाबत सल्ला देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसच्या उपचारावर योग आणि आयुष यांवर आधारित प्रोटोकॉल्सवर इंडियन मेडिकल असोशिएशनकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या प्रश्नांना अखेर आता सरकारने उत्तर दिले आहे. आयएमएच्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, आयुर्वेदीक उपचार आणि योगा यांवर आधारित कोरोनाच्या उपचारांवर प्रोटोकॉल्स प्रयोग आणि वैद्यकिय चाचण्यानंतर लोकांना योगा आणि आयुष यांचा अवलंब करण्याबाबत सल्ला देण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार आरोग्य मंत्रालयाने  सांगितले की, सरकारकडून देण्यात आलेल्या गाईडलाईन्स कोरोनाच्या उपचारांसाठी असून चाचण्यांवर आधारित आहेत. याव्यतिरिक्त आयुष प्रोटोकॉल्सचीही सिफारीश करण्यात आली आहे. मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या इतर वैद्यकिय दृष्टीकोनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यात एलोपॅथिचाही समावेश आहे. दरम्यान आयुर्वेदाने कोरोनावर उपचार होण्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारकडून मागितला  होता. 

इंडियन मेडिकल असोसिएशनने मुद्दा उपस्थित केला होता

आयएमएने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार योगा आणि आयुर्वेदाने कोरोनावर उपचार होऊ शकतात.  या अभ्यासाबाबत  सामाधानकारक पुरावे  आहेत का? असा प्रश्न उपस्थित  केला आहे. हे पुरावे मजबूत आहेत की कमकुवत याबाबतही विचारणा केली होती. कोरोनाचं गंभीर स्वरुप हाइपर इम्यून स्टेटस आहे की इम्यून डेफिशियेंसी स्टेटस?,  याबाबत वैज्ञानिकांचे दाखले आहेत का अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. याशिवाय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाच्या उपचारांसाठी कोणती चाचणी केली जात आहे? सरकारमधील किती मंत्र्यांनी या प्रोटोकॉल्सच्या आधारे आपले उपचार केले आहेत? जर या प्रोटोकॉल्समध्ये तथ्य असेल तर  कोविड केअर आयुष मंत्रालयाकडे सोपवण्यास कोणी रोखले आहे? या प्रश्नांबाबत आरोग्यमंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागण्यात आले होते.

आयुष मंत्रालयानंयाने दिलेल्या गाईडलाईन्स

या नवीन प्रोटोकॉल्सनुसार काही गुणकारी औषधांच्या सेवनाने कोरोनापासून बचाव होऊ शकतो असं स्पष्ट करण्यात आलं होतं. आयुष-64 हे औषध कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी परिणामकारक ठरत असल्याचे सांगितले होते. आयुष मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी रोज अश्वगंधा १-३  ग्राम एमजी एक्स्ट्रॅकचा वापर करायला हवा. याशिवाय गरम पाणी किंवा दूधासह १० ग्राम च्यवनप्राशचे सेवन करायला हवे. कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांना आयुष -64 गोळ्या घेण्याचा सल्ला दिला होता. रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्याचा काय संबंध? वाचा तज्ज्ञांनी दिलेल्या BP नियंत्रणात ठेवण्याच्या टीप्स

कोरोनाची हलकी लक्षणं म्हणजेच ताप, खोकला, घसादुखी,  अतिसाराची समस्या उद्भवत असेल तर गुडुची, पीपली यांचे दोनवेळा सेवन करायला हवे. याव्यतिरिक्त आयुष-64 चे औषध ५०० एमजी च्या दोन कॅप्सूल १५ दिवसांपर्यंत घ्यायला हव्यात. विशेष प्रकारचे योगा, व्यायाम  करायला हवेत. त्यासाठी  ४५ मिनिटं, ३० मिनिटं वेळ काढायला हवा. योगशिक्षकांच्या निरिक्षणाखाली योगा प्रकार केल्यास शरीरासाठी उत्तम ठरेल. असा दावा करण्यात आला होता. चिंताजनक! कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांवर होतंय 'या' नवीन आजाराचं आक्रमण; तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या