शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

Health : ​दुधात साखर ऐवजी गूळ करा मिक्स, होणार सुदृढ !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 7:19 AM

आपणही दुधात साखर मिक्स करुन पितात का? त्याऐवजी गूळ मिक्स करून प्या, होतील हे फायदे !

-Ravindra Moreदूध आणि गूळदोन्हीही शरीरासाठी फायदेशीर आहेत, हे तर सर्वांनाच माहित आहे मात्र दुधात गूळ मिक्स करुन पिणे शरीरासाठी त्यापेक्षाही अधिक फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहसा बहुतेकजण दुधात साखर मिक्स करुन पितात, मात्र आज आम्ही आपणास दुधात गूळ मिक्स करुन पिण्याचे काय फायदे होतात याबाबत माहिती देत आहोत. * अनिद्रा पासून सुटकाजर आपण अनिद्रेच्या समस्येने त्रस्त असाल तर झोपण्याअगोदर एक ग्लास गरम दुधात गूळ मिक्स करुन सेवन करावे. यामुळे आपली अनिद्राची समस्या लवकर दूर होईल. गुळाचे सेवन केल्याने आपले रक्त शुद्ध होते आणि दूध आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करते. सोबतच आपल्या शरीरास रिलॅक्सदेखील करते. * पचनक्रिया सुधारतेपचनसंस्थेशी निगडित अनेक समस्यांवर दूध आणि गूळ खूप फायदेशीर आहे. दूध आणि गूळ मधील पोषक तत्त्व पोटात चांगल्या बॅक्टेरियांना वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे पचन व्यवस्थित होते. याच्या सेवनाने पचनक्रियेच्या सर्व समस्या दूर होतात आणि पोटात गॅसदेखील होत नाही.  * कॅल्शियमचे प्रमाण भरपूर दूध आणि गूळ दोघात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. यासाठी शरीरास सुदृढ बनविण्याबरोबरच हाडांचे आजार किंवा वयानुसार होणारी सांधेदुखीच्या त्रासापासूनदेखील सुटका मिळते. यासाठी रोज गुळाचा लहान तुकडा अद्रकसोबत सेवन करावे आणि गरम दूध प्यावे. असे केल्याने आपले सांधे मजबूत होतील आणि दुखणेही थांबेल. * मासिक पाळीतील वेदना होतील दूरमहिलांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी गरम दुधात गूळ टाकून नक्की सेवन करावे. डॉक्टर्स नेहमी गरोदर महिलांना थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी गूळ सेवन करण्याचा सल्ला देतात. गरोदर महिलांनी रोज गुळाचे सेवन केल्यास त्यांना अ‍ॅनिमिया होत नाही.  * वजन घटविण्यास मदतजर आपण लठ्ठपणाने त्रस्त असाल तर यापासून सुटका मिळण्यासाठी दूध किंवा चहामध्ये साखरेऐवजी गूळ मिक्स करुन सेवन करावे. असे केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. गूळमध्ये प्रोटीनच्या रुपात एनर्जी असते आणि दूध, चरबीला जाळण्यास मदत करते.Also Read : HEALTH : पुरुषांनी रोज प्यावे ‘हे’ दूध, पण का? source : navabharattimes