केरळमध्ये कोरोनाची माहामारी पसरल्यानंतर संक्रमणाचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यााठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. आता केरळमध्ये कोरोनाप्रमाणेच शिगोला या आजाराचा प्रसार होत आहे. या आजारामुळे ११ वर्षीय मुलाला मृत्यूचा सामना करावा लागला आहे. या आजाराची लक्षणं असलेले लोक आता एर्नाकुलम जिल्ह्यातही दिसून येत आहेत. येथील एका ५६ वर्षीय महिलेमध्ये या आजाराची लक्षणं दिसून आली आहेत.
केरळमधील कोझिकोडनंतर आता एर्नाकुलममध्येही शिगोला या आजाराचे रूग्ण आढळून आले आहेत. चोट्टानिक्काराच्या रहिवासी असलेल्या एका ५६ वर्षीय महिलेत लक्षणं दिसून आली होती. या महिलेवर एर्नाकुलमच्या एका खासगी रुग्णालायात उपचार सुरू आहेत. २३ डिसेंबरला तीव्र तापाची लक्षणं दिसल्यामुळे या महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.
एर्नाकुलम जिल्ह्यातील जिल्हाधिकारी एस सुहास म्हणाले की,'' घाबरून जाण्याचे कारण नाही. केवळ दोन जणांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. आरोग्य विभागातर्फे दिलेल्या माहितीनुसार की या भागात लसीकरण मोहीम सुरू आहे. चोट्टनिक्कारा आणि आजूबाजूचा परिसर निर्जंतुकीकरण केला जात आहे.''
दरम्यान कोझिकोड जिल्ह्यात एका दीड वर्षीय मुलाला पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास होऊ लागल्यानं त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला शिगेला जीवाणूंचा संसर्ग झाल्याची माहिती काल डॉक्टरांनी दिली. शिगेला जीवाणूंमुळे शिगेलॉसिस हा आतड्यांचा आजार होऊ शकतो. केरळमध्ये आतापर्यंत शिगेलाचे ८ रुग्ण सापडले आहेत.
Coronavirus: भारतात कोरोनाचा आणखी एक गंभीर साइड इफेक्ट आला समोर, डॉक्टरांनी दिला इशारा....
शिगेलाचे रुग्ण आढळून येऊ लागल्यां कोझिकोड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अलर्टवर आहे. कोझिकोड जिल्हा याआधी निपाह विषाणूचे रुग्ण सापडल्यानं चर्चेत आला होता. 'जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असून घाबरण्याची आवश्यकता नाही. प्रशासन आवश्यक पावलं उचलत आहे,' अशी माहिती कोझिकोडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. जयश्री यांनी दिली होती.
आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती
लोकांनी सतर्क राहावं आणि अतिसाराचा त्रास होताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन डॉ. जयश्री यांनी केले होते. अतिसार हे शिगेला संसर्गाचं प्रमुख लक्षण आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात २६ जणांना अतिसाराचा त्रास झाला आहे. संक्रमित जेवण आणि पाण्यामुळे शिगेला जीवाणूचा संसर्ग होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. केरळमधील मुंडिक्कल्थजम, कोट्टापरंबू आणि वायनाडमध्ये शिगेलाचे रुग्ण आढळून आले आहेत. शिगेलामुळे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. कोझिकोडमध्ये १९ डिसेंबरला एक ११ वर्षीय मुलगा शिगेलाचा बळी ठरला.