शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पावसाळ्यात सुका खोकला आणि कफची समस्या टाळण्यासाठी आधीच वापरा 'हे' सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 12:41 PM

या समस्येपासून बचावसाठी वेळीच आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काही घरगुती उपयांनी तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता.

मार्चमध्ये जेव्हा कोरोना विषाणूंचा प्रसार झपाट्याने वाढत होता. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी लक्षणांबाबत गाईडलाईन्स देण्यात आल्या होत्या.  या लक्षणांमध्ये सुका खोकला, सर्दी, ताप, श्वास घ्यायला त्रास होणं या लक्षणांचा समावेश करण्यात आला होता. जुलैमध्ये  लासेंटमध्ये छापलेल्या एका अभ्यासानुसार रुग्णालयात भरती झाल्यानंतर रुग्णांना सुका खोकला आणि कफ होण्याची समस्या उद्भवली. सीडीसीनेही आपल्या गाईडलाईन्समध्ये सुका खोकला, कफ या लक्षणांचा समावेश केला होता. या समस्येपासून बचावसाठी वेळीच आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काही घरगुती उपयांनी तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता.

जास्तीत जास्त पाणी पिऊन स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. सुका खोकला घालवण्यासाठी गरम पाण्याची वाफ घ्या. घश्याला आराम देण्यासाठी लिंबू आणि मध घातलेल्या गरम पाण्याचे सेवन करा. 

खोकला जास्त येत असेल औषधी काढ्याचे सेवन करा. छातीत कफ जमा झाल्यास इतर ठिकाणी थुंकल्यामुळे संक्रमण पसरल्याचा धोका जास्त असतो. त्यासाठी आधीच सावधगिरी बाळगून खोकला होण्यापासून बचाव करायला हवा.  

फुफ्फुसांमध्ये जमा झालेले कफ मोकळे होण्यासाठी दिवसातून कमीत कमी तीनवेळा वाफ घ्या. व्यायाम केल्यानं, चालल्यानं फुफ्फुसांतील कफ बाहेर पडण्यास मदत होते. म्हणून दिवसातून २० ते ३० मिनिटं वेळ काढून व्यायाम करा. 

मीठ हे एक जंतूनाशक आहे. त्यामुळे गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करायला हव्यात. त्यामुळे घश्यातील सुज कमी होण्यास मदत होते. पाण्याच्या गुळण्या करण्यासाठी स्वतःचा एक ग्लास वेगळा ठेवा. कारण अनेकांना हातात पाणी घेऊन गुळण्या करण्याची सवय असते.

शक्यतो ग्लासने पाणी घेऊन गुळण्या करा. हिरड्या संवेदनशील असतात. थंड पाण्याच्या वापराने तोंडात जळजळ होऊ शकते. त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करा.  गुळण्या करताना तुम्ही या पाण्यात  मीठ घालू शकता.

गुळण्या करताना कोमट पाण्यात बेकिंग सोडा घातल्याने श्वासांमधून येणारी दुर्गधी कमी होण्यास मदत होते. गुळण्या करत असताना तोंडाची  हालचाल करा. जीभ आतल्याआत सगळ्या बाजूला फिरवा. पाणी घशापर्यंत नेऊन पुन्हा पुढे आणा. अशा पद्धतीने गुळण्या केल्यास घश्यातील वेदना कमी होण्यास मदत होईल.

२०-३० सेकंद गुळण्या करताना पाणी तोंडात ठेवल्यानंतर सावधगिरीने पाणी बाहेर फेकून द्या. गुळण्या करून झाल्यानंतर दात स्वच्छ घासा.

कोरोनाचं नवीन औषध लॉन्च; सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार

भारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार? भारत बायोटेकचा मानस

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स