शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

DJ च्या तीव्र आवाजामुळे हृदयविकाराचा धोका; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आवाज...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 5:51 PM

Health Risks of Loud Music : काही दिवसांपूर्वी भोपाळमध्ये डीजेच्या मोठ्या आवाजामुळे 13 वर्षीय मुलाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Health Risks of Loud Music : लग्न, मिरवणूक, पब किंवा इतर अनेक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात DJ लावला जातो. या कर्कष आवाजाने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे, अलीकडेच मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये डीजेच्या मोठ्या आवाजामुळे एका 13 वर्षीय मुलाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही, याआधीही देशाच्या विविध भागात डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका किंवा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या आवाजात गाणी किंवा संगीत ऐकल्याने हृदयविकाराचा झटका येतो का? मोठा आवाज आरोग्यासाठी किती घातक आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

डीजेचा मोठा आवाज किती धोकादायक आहे?WHOच्या माहितीनुसार, मोठ्या आवाजातील संगीत किंवा कुठल्याही मोठ्या आवाजामुळे 12 ते 35 वर्षे वयोगटातील सुमारे 100 कोटी लोकांना श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका आहे. मोठ्या आवाजामुळे आरोग्याची अनेक हानी होऊ शकते. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, निर्धारित मर्यादेपेक्षा डेसिबल पातळी वाढल्यास केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही, तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. 

मोठ्या आवाजामुळे कोणते रोग धोकादायक आहेत?बहिरेपणामानसिक ताणचिडचिडतीव्र डोकेदुखीउच्च रक्तदाबनिद्रानाशस्मरणशक्ती कमी होणेमेंदूतील रक्तस्त्रावकशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाहीहृदयविकाराचा धोका

डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा धोका आहे का?आपल्या कानांचा हृदयाशी थेट संबंध असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. म्हणजे जो काही आवाज कानापर्यंत पोहोचतो, तो नसांद्वारे हृदयापर्यंतही पोहोचतो. जेव्हा डीजेचा आवाज सतत कानाच्या पडद्यावर पडतो, तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात. कानाच्या नसांमध्ये रक्त घट्ट होऊ शकते आणि हे जास्त काळ चालू राहिल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू जर्सी मेडिक्सच्या अहवालानुसार, अतिशय गोंगाट असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सर्वाधिक असतो. उदाहरणार्थ, विमानतळ परिसरात हृदयविकाराचा धोका 72% वाढतो. लहान मुले, वृद्ध लोक किंवा कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना मोठ्या आवाजाचा धोका असतो.

किती आवाज आरोग्यासाठी धोकादायक आहे?ध्वनीची तीव्रता डेसिबल (DB) मध्ये मोजली जाते. हिअरिंग हेल्थ फाउंडेशनच्या मते, 70 डेसिबल किंवा त्यापेक्षा कमी आवाज सुरक्षित आहे. यापेक्षा जास्त आवाजाच्या संपर्कात राहणे धोकादायक ठरू शकते. तज्ञांच्या मते, आजकाल वापरल्या जाणाऱ्या संगीत उपकरणे, इअरफोन्स आणि इअरबड्सचा आवाज 60% व्हॉल्यूम पातळीवर 75-80 डेसिबल आहे, तर पूर्ण आवाजात हा 110० डेसिबलपर्यंत पोहोचतो. एखाद्याला दररोज 8 तासांपेक्षा जास्त काळ 85 डेसिबलपेक्षा जास्त आवाज येत असेल, तर त्याची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स