Health : निरोगी हृदयासाठी मोहरीचे तेल गुणकारी !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2017 9:01 AM
या तेलाच्या सेवनाने रक्तातील फॅटचे प्रमाण कमी होते त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
मोहरीच्या तेलात फॅटी अॅसिड आणि नैसर्गिक अॅन्टी आॅक्सिडेंटचे प्रमाण भरपूर असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यालाच सरसोचे तेलही म्हणतात. हे तेल खाद्यतेल म्हणून वापरण्यास उत्तम आहे. या तेलाच्या सेवनाने रक्तातील फॅटचे प्रमाण कमी होते त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. शिवाय रक्तप्रवाह सुरळीत राहून उच्च रक्तदाबाचा धोका टळतो. कच्च्या घाणीचे मोहरीचे तेल रिफाईन्ड नसते. नैसर्गिक पद्धतीने बनवलेले हे तेल आरोग्यासाठी अधिक उपयोगी आहे. ओराग्यासाठी चांगले असलेल्या तेलात कोलेस्ट्रॉल व फॅट असायला नको. सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी व मोनोसॅच्युरेटेड व पॉलिसॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असायला हवे. त्याचे एन-६ व एन-३ अॅसिड गुणोत्तर प्रमाणात असायला हवे. मोहरीचे तेलात हे सर्व गुणधर्म आहेत. Also Read : Health : हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी ‘चॉकलेट’ उपयुक्त !