पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. शरीरात सुमारे 60 ते 70 टक्के पाणी असते. आपले शरीर जगण्यासाठी पाण्यावर अवलंबून असतं. शरीरातील सर्व सेल्स, टिश्यू आणि अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. प्रत्येकाने दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?, उभे राहून किंवा बसून पाणी पिणे फायदेशीर आहे का? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. असे मानले जाते की उभे राहून पाणी पिऊ नये, अन्यथा शरीराला इजा होते. शेवटी ही गोष्ट किती खरी आहे हे जाणून घेऊया.
नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्रिवेंटिव्ह हेल्थ डिपार्टमेंटच्या डायरेक्टर डॉ. सोनिया रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, उभे राहून किंवा झोपून राहून पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे अगदी खरे आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्व लोकांनी बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी प्यायल्याने पाण्यातील मिनरल्स डाइजेस्टिव सिस्टमपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवू शकते. ज्यांना अपचन, बद्धकोष्ठता किंवा एसिडिटीचा त्रास होतो. लोकांनी बसून पाणी प्यावे.
डॉ.सोनिया रावत सांगतात की, उभे राहून पाणी प्यायल्याने किडनी आणि लिव्हरचे नुकसान होऊ शकते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते. किडनी शरीरात फिल्टरसारखे काम करते आणि त्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे शरीराची संपूर्ण यंत्रणा बिघडू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुस आणि हृदयाचेही नुकसान होते. यामुळे सांधेदुखी आणि हाडांच्या इतर समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्याने मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
पाणी नेहमी बसून आणि आरामात प्यावे. जर तुम्ही खूप वेगाने पाणी प्याल तर त्याचा कमी फायदा होईल. पाणी हळू हळू पिऊन पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने इलेक्ट्रोलाइटचे संतुलन चांगले राहते आणि शरीराला आवश्यक मिनरल्स मिळतात. आपण बाटली किंवा ग्लासमधून पाणी पिऊ शकता. एका दिवसात पाण्याचे प्रमाण 2-3 लिटर असावे. पाणी शरीरातील हायड्रेशन राखते आणि सर्व अवयव निरोगी ठेवते असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"