Health : ...म्हणून 'पोहे' आहे सर्वात हेल्दी नाश्ता !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2017 11:05 AM
सेलिब्रिटींच्याही डायटमध्ये असतो पोह्याचा समावेश !
-रवींद्र मोरे आपले शरीर हेल्दी असण्यासाठी सेलिब्रिटी खूपच प्रयत्न करीत असतात. जिम, योगा बरोबरच त्यांचा डायट प्लॅनदेखील परफेक्ट असतो. त्यांच्या डायटमध्ये शरीराला फिट ठेवण्यासाठी जे काही हेल्दी पदार्थ असतील त्यांचा समावेश असतोच. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे पोहे होय. सामान्यांपासून सेलेब्सपर्यंत बहुतांश लोकांच्या डायटमध्ये पोह्याचा समावेश दिसून येतो. पोह्यातील आरोग्यवर्धक फायद्यांमुळे डॉक्टरदेखील सकाळच्या नाश्त्यामध्ये पोह्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात. * जाणून घ्या पोह्याचे फायदे - पोह्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. विशेष म्हणजे वर्कआउट केल्यानंतर पोहाचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे बॉडी बिल्डिंगमध्ये मदतही होते. - पोहे पूर्णत: ग्लूटेन फ्री असतो त्यामुळे ग्लूटेनची अॅलर्जी असणारे लोकंही पोहाचे सेवन करु शकता. शिवाय वजन कमी करणाऱ्यासाठीही पोहा फायदेशीर आहे. - पोह्यात फायबर असल्याने पोट बऱ्याच वेळापर्यंत भरल्यासारखे वाटते ज्यामुळे वारंवार खाण्याची सवय दूर होते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. - पोह्यामध्ये लोहाचे प्रमाण खूपच जास्त असते जे शरीरातील ब्लड सेल्ससाठी खूपच फायदेशीर ठरते. ज्यांना अॅनिमियाची समस्या आहे त्यांनीही नाश्त्यामध्ये पोह्याचा समावेश करावा. - पोह्यामध्ये विटॅमिन बी-१ देखील अधिक प्रमाणात आढळते यासाठी मधुमेही रुग्णांसाठीही पोहे गुणकारी आहे. पोह्याच्या सेवनाने ब्लड शुगरची पातळी नियंत्रित राहते. - ज्यांना पचनसंस्थेची समस्या आहे किंवा ज्यांना बद्धकोष्ठता सारखा आजार आहे ते देखील पोहे सेवन करु शकता. पोहे खूपच हलके असल्याने सहज पचते. - पोह्यामध्ये दही मिक्स करून खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. Also Read : Health Alert : चहा चपातीचा नाश्ता खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का ? : निरोगी जीवनासाठी ब्रेक फास्ट महत्त्वाचा