Health : ...म्हणून खावे तूप !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2017 12:08 PM
‘खाईन तुपाशी, नाहीतर राहिल उपाशी...’ असे म्हटले जाते ते खोटे नव्हे.
‘खाईन तुपाशी, नाहीतर राहिल उपाशी...’ असे म्हटले जाते ते खोटे नव्हे. मात्र तूप खाणे आरोग्यासाठी योग्य की अयोग्य या विषयी बºयाचदा वादही होतो. परंतु एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या अहवालामुळे या वादाला विराम मिळणार असून तूप का खायला हवे याचे स्पष्टीकरणही या अहवालात देण्यात आले आहे. लवकर खराब होत नाहीतुपातील दुधाचा अंश निघून गेल्याने ते दीर्घकाळ टिकते. त्यामुळे तुपाला फ्रिझमध्ये ठेवायची गरज नसते. अनेक आठवडे सामान्य तापमानात तूप साठवून ठेवता येते. तेलापेक्षा कमी घातकतेल जास्त गरम केल्यास त्यात विषारी पदार्थ तयार होतात. परंतु तुपात असे होत नाही. सोयाबीन तेल १६० अंश सेल्सिअस तापमानावर गरम केल्यास अॅक्रिलमाईड नावाचा घातक पदार्थ तयार होतो. तूप गरम केल्यास अॅक्रलमाईड तयार होण्याचे प्रमाण दहा पटींनी कमी असते. पचन सुधारण्यास लाभदायकलोण्यापेक्षा अधिक घट्ट असल्यामुळे यामध्ये ब्युटिरिक अॅसिडचे प्रमाण थोडे जास्त असते. तूप शरीरात उत्तम वंगणाचे काम करते. यामुळे पचन सुधारते. वजन कमी करण्यासाठी तुपात कॉन्जुगेटेट लिनॉलिक अॅसिड असल्यामुळे तूप खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.