शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

HEALTH : ​...म्हणून उन्हाळ्यात करावे ‘या’ ५ फळांचे सेवन !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2017 10:23 AM

आपण अनेकदा या फळांकडे दुर्लक्ष करतो आणि आजारपणाला आमंत्रण देतो. या फळांचे काही आरोग्यदायी गुणधर्म असल्याने उन्हाळ्यात यांचे सेवन केल्यास शरीराला फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया त्या फळांबाबत...

-Ravindra Moreनिसर्गाची किमया तशी वेगळीच आहे. एकीकडे उन्हाळ्यात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे आणि दुसरीकडे मनुष्य प्राण्याचा या रणरणत्या उन्हापासून बचाव व्हावा म्हणून याच काळात काही फळांची निर्मिती होते. उन्हाळ्यात जांभूळ, करवंद, बोर, कलिंगड, तुती यासारखी फळं दिसू लागतात. मात्र आपण अनेकदा या फळांकडे दुर्लक्ष करतो आणि आजारपणाला आमंत्रण देतो. या फळांचे काही आरोग्यदायी गुणधर्म असल्याने उन्हाळ्यात यांचे सेवन केल्यास शरीराला फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया त्या फळांबाबत...* कलिंगडशरीराला आतून थंडावा मिळण्यासाठी कलिंगडाचा वापर करण्यास डॉक्टरही सल्ला देतात. शिवाय उन्हाळ्यात होणाऱ्या अनेक त्रासांवर जसे लघवीचा त्रास, अंगावर उष्णतेमुळे उठणारे पुरळ आदींवर कलिंगड म्हणजे रामबाण उपाय आहे. कलिंगडामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते, जे तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास साहाय्य करते. कलिंगडात शरीराला आवश्यक अमिनो अ‍ॅसिड्स असतात. कलिंगडाच्या साली डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना थंडावा मिळतो.* जांभूळचवीला आंबट-गोड व रसरशीत अशी लाबंट आकाराची जांभूळ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या फळात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे शरीराला पोषकत्व मिळते. लोहामुळे कावीळ, रक्तदोषाविकार हे आजार लवकर बरे होतात. जांभळाचे बी व साल यांचे चुर्ण मधुमेह या आजारावर अत्यंत उपयुक्त आहे. दात व हिरड्या कमकुवत झाल्या असतील व त्यातून रक्त येत असेल तर त्यावरही जांभळाच्या सालीचा वापर केला जातो. जांभळाच्या सरबतामुळे पोट साफ होण्यास मदत होते. पण जांभळे खाताना नेहमी काळजी घ्यावी, रिकाम्या पोटी जांभळे खाऊ नयेत.  * बोरविविध जातीत उपलब्ध असणाऱ्या बोरांपैकी आंबटगोड बोर हे औषधी गुणधर्माची समजली जातात. बहुतेक ठिकाणी तोंडाला चव  येण्यासाठी बोरे वाळवून चूर्ण तयार केले जाते. तसेच वात विकार आणि जुलाब होण्याचा त्रासही बोरांच्या सेवनाने बरा होतो. वारंवार चक्कर येत असतील तर अशावेळी बोरांचे सेवन करावे. * करवंद‘डोंगरची काळी मैना’ म्हणून ओळखले जाणारे करवंद या रानमेव्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. यात ‘क’जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आहे जे त्वचाविकारामध्ये अधिक फायदेशीर ठरते. शिवाय यात मोठ्या प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असल्याने या दिवसांत उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक आजारांवर करवंद फायदेशीर आहेत. या दिवसात उष्णतेमुळे शरीराची काहिली होते तेव्हा करवंदाचे सरबत प्यायल्याने अधिक आराम मिळतो. करवंदामध्ये फायबरदेखील भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असल्याने हाडांसाठी देखील करवंद उत्तम आहेत. * तुती या फळात ‘अ’ जीवनसत्त्व तसेच कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते, ज्याचे उन्हाळ्यात सेवन करणे फायदेशीर ठरते. तुतीची फळं ही आंबट, गोड असतात.