शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

HEALTH : घसा दुखतोय? ‘या’ घरगुती उपायाने मिळेल आराम !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 12:58 PM

घसा खराब होण्याची समस्या बहुतांश हवामानाच्या बदलामुळे निर्माण होते. बऱ्याचदा यामुळे खाताना त्रास होणे, तसेच कणकणदेखील जाणवते. यासाठी घसा खराब झाल्यास काय करू शकता याबाबत जाणून घेऊया.

घसा खराब होण्याची समस्या बहुतांश हवामानाच्या बदलामुळे निर्माण होते. व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन अथवा घशाला काही इजा झाल्यास घशाच्या समस्येला सामोरे जावे लागते. बऱ्याचदा यामुळे खाताना त्रास होणे, तसेच कणकणदेखील जाणवते. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर काही घरगुती उपायांनी घशाला आराम पडू शकतो. यासाठी घसा खराब झाल्यास काय करू शकता याबाबत जाणून घेऊया.घसा खराब झाल्यास अनेकजण लसणाच्या पाकळीचेदेखील सेवन करतात. कच्च्या लसणामध्ये एंटिबॅक्टेरिया आणि एंटिसेप्टिक गुण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जे घशासाठी फायदेशीर ठरू शकतात. याचबरोबर आलंयुक्त चहा, तुळशीची पाने, तुळशीचा काढा किंवा चिकन सूपचे सेवन करू शकता. यामुळे विनाऔषध तुम्हाला आराम मिळू शकतो. काहीजण घरगुती उपायांबरोबरच औषध घेणे देखील पसंत करतात. गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करणे हा यावरचा उत्तम उपाय ठरू शकतो, यात थोडीशी हळद टाकल्यास घशाला लवकर आराम पडण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर मधाचे सेवनदेखील यावरील चांगला उपाय ठरू शकतो. खवखवणऱ्या घशावर मधाचे सेवन थेट परिणाम करण्यास मदत करू शकते. घशाला त्रास जाणवत असल्यास ‘सी’ जीवनसत्वाची मात्रा अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास घशाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते.श्वसन प्रणालीतील वरच्या नळीला संसर्ग झाल्यासदेखील घशाचा त्रास जाणवतो. लॅबमधील टेस्टद्वारेच याचे निदान होऊ शकते. गरज नसताना अँटिबायोटिक्सचे सेवन हानिकारक ठरू शकते. अधिक त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधाचे सेवन करावे.