नवी दिल्ली : विकसीत आणि काही विकसनशील देशांच्या तुलनेत भारतात तणावाचा स्तर अधिक आहे. भारतातील साधारण ८९ टक्के लोकांपैकी ८६ टक्के लोक जागतिक स्तराच्या तुलनेत तणावाने अधिक जास्त पीडित आहेत.
मुंबईसह इतरही मोठ्या शहरांमध्ये तणावाचा स्तर वेगाने वाढत आहे. प्रत्येक ८ पैकी एक व्यक्ती तणावातून बाहेर येण्यासाठी अडचणींचा सामना करत आहे. सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे.
सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स ही अमेरिकेतील एक आंतरराष्ट्रीय आरोग्य सेव संस्था आहे. या संस्थेकडून नुकताच अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, फ्रान्स, चीनसह २३ देशांमध्ये सर्व्हे करण्यत आला. यात हा खुलासा करण्यात आला.
या सर्व्हेदरम्यान, १४, ४६७ ऑनलाईन मुलाखती घेतल्यात. यातून समोर आलं की, भारत लागोपाठ चौथ्या वर्षी या तणावाच्या स्तरात सर्वात वर आहे. पण यावर्षी भारतात शारीरिक, सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्यात थोडी कमतरता आली आहे.
या अभ्यासातून समोर आलं की, वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्याबाबतील लोक अग्रेसर आहेत. सर्वात शेवटी झोपेच्या परिवर्तनाला स्थान मिळालं.