शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
2
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
3
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
4
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
5
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
6
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
7
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
9
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
10
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
11
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
12
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
13
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
14
'मिट्टी में मिला देंगे...', 'योगी'राजमध्ये आतापर्यंत किती गुन्हेगारांचा एन्काउंटर? पाहा आकडेवारी
15
"हे कुठून आले?"; किरीट सोमय्यांचं आकडेवारी बोट, व्होट जिहादबद्दल काय बोलले?
16
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
17
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
18
"लाडक्या बहिणींना मदत करताना जाहिरातबाजी आणि चमकोगिरीची गरज काय?", काँग्रेसचा सवाल
19
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
20
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 

HEALTH : उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2017 10:48 AM

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?

-Ravindra Moreउन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकू लागल्याने जनजीवन विस्कळू लागले आहे. उन्हाचा परिणाम आरोग्याही होत असून अनेक शारीरिक व्याधीही डोके वर काढू लागले आहेत. आजच्या सदरात उन्हाच्या तडाख्यापासून काय काळजी घ्यावी याबाबत जाणून घेऊया. सूर्य पृथ्वीच्या मध्यावर, म्हणजेच विषुववृत्तावर येत असल्याने पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये दुपारच्यावेळी तळपत्या उन्हात बाहेर पडू नये. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कडक ऊन असल्याने, उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते. शिवाय शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावण्याचीही शक्यता आहे. अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पाणी जास्तीत जास्त पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ज्यांना ह्रदयविकाराचा तसेच डायबेटीजचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित चेक-अप करत राहावे. आहारामध्येही, रसदार फळांचा वापर करावा. तसेच मांसाहार कदापिही करु नये.    उन्हामुळे मृत्यू का होतो?आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?* आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७ अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात* घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.* पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं*  जेव्हा बाहेरचं तापमान ४५ अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७ अंशाच्या पुढे जाऊ लागतं.* शरीराचं तापमान जेव्हा ४२ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरश: शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)* स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.* रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषत: मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.* माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडू शकतात .* उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान ३७ अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.उष्माघातापासून सुरक्षेसाठी अशी घ्या काळजी* तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या.* सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.* बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.* प्रवास करताना सोबत पाण्याची बॉटल घ्यायला विसरू नका.* आपलं घरं थंड ठेवा, पडदे लावा, सनशेड बसवा आणि शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवा. * उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा. डोके, गळा, चेहºयासाठी ओल्या कपड्याचा वापर करा. * अशक्तपणा, कमजोरपणा जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. * ओआरएस, घरातील लस्सी, तोरणी, लिंबू पाणी किंवा ताक इत्यादी प्या. * जनावरांनाही सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या.* थंड पाण्याने आंघोळ करा.* दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान उन्हात फिरू नका.* मद्यसेवन, चहा, कॉफी आणि काबोर्नेटेड सॉफ ड्रिंक्स पिणं टाळा, त्यामुळे डिहायड्रेशन होतं.* उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका. * पार्किंग केलेल्या वाहनात मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.