health : रात्री अंघोळ करण्याचे आहेत अनेक फायदे !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2017 1:01 PM
शरीराची स्वच्छता आणि फ्रेश वाटावे म्हणून आपण सर्वचजण सकाळी अंघोळ करतो. मात्र रात्री अंघोळ केल्याने अनेक फायदे होतात.
शरीराची स्वच्छता आणि फ्रेश वाटावे म्हणून आपण सर्वचजण सकाळी अंघोळ करतो. मात्र रात्री अंघोळ केल्याने अनेक फायदे होतात, असे संशोधनातून आढळले आहे. रात्री अंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा क्षणात दूर होतो, त्यामुळे पुन्हा फ्रेश वाटून मनाला शांतता मिळते शिवाय झोपही चांगली लागते.ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी तर रात्री अंघोळ आवर्जून करावी, कारण रात्री अंघोळ केल्याने वजन कमी होते,असे एका संशोधनात असे स्पष्ट झाले आहे. डोके दुखीची समस्या असल्यास रात्री अंघोळ केल्याने फायदा मिळतो. तसेच त्वचेसंबंधी रोगांपासून सुटका मिळते. याचबरोबर त्वचा निरोगी राहून उजळते.जर दिवसभराच्या थकव्याने तुमच्या मांसपेशी आखडल्या असतील तर रात्रीच्या अंघोळीने शरीर रिलॅक्स होते.